चिमूर/रोहित रामटेके
चिमूर : - चिमूर तालुका हा सर्वात मोठा तालुका असून या क्षेत्रात सर्वाधिक शेतकरी वर्ग आहे या चिमूर पंचायत समिती मध्ये कित्येक कृषी अधिकारी आले आणि गेले पण सन २०१६ पासून जे कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहे त्यांच्या शासकीय नियमाला डावलून भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात सुरु आहे एकाच लाभार्थीला दोन विहिरी देण्यात आल्या व याच लाभार्थीला जवाहर विहिर योजनेचा लाभ माणेमोहाळी सर्वे.नं.९९ आराजी क्षेत्र.१.६२ या शेतात पहीली विहिर देण्यात आली असून हि जवाहर योजनेतून सन २००७ ते २००८ या वर्षाला मंजुरी देण्यात आली असून २३ जून २०१४ या वर्षाला विहिरीचे काम पूर्ण करण्यात आली.
त्या लाभार्थीचे नाव भास्कर झिंगु चौधरी रा.म्हसली असे आहे .विहिर योजनेचे नाव बिरसा मुंडा कृषी क्रांती सन २०१६ ते २०१७ असे कालावधी असून शेत अडेगाव देश सर्वे.नं.६४ आराजी क्षेत्र ६.१२ येथे आहे. हि दुसरी विहिर किंमत. २५००००/- रुपये चा लाभ घेण्यात आला असून एकाच लाभार्थीला दोन विहिरीचा लाभ देण्यात आलं असून अर्ज करणाऱ्या व मागणी करणाऱ्या गोर गरीब शेतकऱ्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही व चिरी - मिरी च्या बळावर संपूर्ण जग जिंकता येतं हे खोटं नसून या चिमूर पंचायत समितीतिल कृषी विभागामध्ये हे सिद्ध झालं आहे.मग online व offline नियमांचं नेहमी उल्लंघन का होत असतं ? ते म्हणजे असं मग या कर्मचाऱ्याची संपूर्ण शासकीय काम - काजाची चौकशी करून कारवाही शासकीय नियमानुसार करण्यात यावी.अशी चर्चा संपूर्ण चिमूर पंचायत समिती मध्ये सुरु असून १००% वरील लिहिलेला मजकूर सत्य आहे व या घटना पुन्हा घडू नये याकरीता वरिष्ठ अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारे चिरी - मिरी ची प्रक्रिया न राबविता जनते समोर हा संपूर्ण विषय उघड आणावं अशी चर्चा संपूर्ण चिमुर शहरात रंगली आहे.