पुणे : प्रतिनिधी
दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हे सर्व विभागीय मंडळांना गणक यंत्र विभागामार्फत पुरविली जात होती. परंतु २०१८ मध्ये झालेल्या फेरपरिक्षेत प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे राज्यात २०१९ आणि त्यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार, विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.
प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असेल तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे येवून कराव्यात. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळाबाबतच्या दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यावे. फोटो चुकीचा असल्यास फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारून सही करावी. अशा सूचना शाळा महावविद्यालयांना देण्याचे आदेश विभागीय सचिवांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे, ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्याबाबतचे संकेतस्थळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे देखील मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन देण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात घेण्यात आला होता. तो निर्णय यशस्वी झाला असून संपूर्ण राज्यात आता फेब्रुवारी-मार्च २०१९ च्या दहावी, बारावी परिक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याचे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे.