नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संविधान चौक येथून दुपारी ३ वाजता हा मार्च निघाला. तत्पूर्वी संविधान चौक येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक सेल्फी पॉईंट होता. यात सायलेंस मार्च फॉर विदर्भ लिहिलेले असून त्यासमोर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. तसेच स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. यासोबतच विदर्भ राज्याबाबत आपल्याला काय वाटते, ते एका पेपरवर लिहून द्यावयाची आगळीवेगळी मोहीमह राबवण्यात आली. यातही नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर हा मार्च निघाला.
‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’