- किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नांना यश,
- महावितरणच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी
- जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द,
चंद्रपूर- महावितरण केंद्रात आऊट सोंर्सीग टेक्नेशीयन कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. ठेकेदाराने येथील कामगारांचे वेतण दिड हजार रुपयांनी कमी केल्याने त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. यावर तोडगा काडून जोरगेवार यांच्या मागणीवरुन संबधीत कंत्राटाराचा कंत्राट महावीतरणने रद्द करत नव्या कंत्राटदाराला काम दिले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा कामावर रुजु आहे.
चंद्रपूर महावितन केंद्रात आऊट सोंर्सीगचा कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून या कामगारांना 8 हजार 500 रुपये ईतके वेतन दिल्या जात होते. ऑक्टोबर महिण्यात सदर कंत्राटदाराचा कंत्राट संपला व हा कंत्राट नांदेड येथील कंत्राटदाराने घेतला मात्र या कंत्राटदाराने मनमानी कारभार करत कामगारांच्या वेतणात दिड हजार रुपयांची कपात केली. त्यामुळे या कामगारांनी काम बंद आंदोलन पूकारले होते. असे असतांनाही कंत्राटदाराने याकडे लक्ष दिले नाही. अखेर या कामगारांनी किशोर जोरगेवार यांचे कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली त्यानंतर जोरगेवार यांनी महावितरणचे कार्यालयात जाऊन संबधीत कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करुन कामगारांना न्याय द्याव्या अशी मागणी केली. अन्यथा आमच्या पध्दतीने कंत्राटदाराशी निपटू असा ईशारा दिला होता. तसे निवेदनही त्यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता अशोक मस्के यांना दिले होते. यावेळी मस्के यांनी तात्काळ संबधीत कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावला. तर काल शनिवारी या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करत कामगारांना 8 हजार 500 रुपये वेतन देण्यात यावे या अटीवर नव्या कंत्राटदाराला हा कंत्राट देण्यात आला आहे. त्यामूळे आता या कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहे. आज रविवारी या सर्व कामगारांनी किशोर जोरगेवार यांचे कार्यालय गाठून त्यांचे अभार मानले.