সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 29, 2018

तीन कार जाळणारे आरोपी आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

  • दोन अल्पवयीन आरोपीह सराईत गुन्हेगाराला अटक
  • खापरखेडा पोलिसांच्या प्रयत्नांना यश

खापरखेडा/Kapil Wankhede
जुन्या वादातून दोन अल्पवयीन आरोपीसह एका तळीपार खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीने परिसरात पेट्रोल ओतून तीन कार जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारला रात्री उशिरा घडली सदर घटनेतील आरोपीनी मोठया शिताफीने अवघ्या आठ तासात मुसक्या आवळल्या असून तिन्ही आरोपीना अटक करण्यात खापरखेडा पोलीसांना यश आले आहे अश्विन श्यामराव ढोणे वय 24 रा वार्ड 4 इंदिरा नगर खापरखेडा, कुणाल सुरेश गायकवाड वय 17 रा शिंगोरी ता पारशिवणी,अनिल विरपाल नागर वय 17 रा वार्ड 4 भानेगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्याशी मागील एक वर्षापूर्वी आरोपी अश्विन ढोणे याने काही कारणावरून वाद घातला होता एक वर्षांपूर्वी अश्विनने त्यांची कार जाळण्याचा प्रयत्न केला होता मात्र शुक्रवारला परत आरोपी अश्विन, त्याचे सहकारी मित्र आरोपी कुणाल व अनिल यांनी संगनमत करून रात्री 11.30 च्या सुमारास झिंगरे यांच्या घरासमोर ठेवलेली मारोती स्वीप्ट कार क्रमांक MH-40-BE-8116 पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला यादरम्यान आरोपीनी अजय डेअरिया व भुरू पठाण यांच्या घरासमोर ठेवलेली मारोती रिटज कार क्रमांक MH-31-EA-4063 व टाटा इंडिका कार क्रमांक MH-31-CN-2355 जाळण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत आठ तासात शनिवारला पौणिकर गल्लीत कारने जात असताना फिल्मी स्टाईल पाठलाग करून तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले सदर घटनेत तिन्ही कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून खापरखेडा पोलीसांनी गुन्ह्याची नोंद करून मिळालेल्या तक्रारी वरून भांदवी 435, 427, 34 कलमान्वये अटक केली आहे सदर कार्यवाहीत पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्यासह नितेश पिपरोदे, सुरेंद्र वासनिक, दिपक दारोडे, अलीम खान यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे पुढील तपास सुरू असून तपासा दरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे

बदला घेण्यासाठी जाळल्या कार?काही दिवसांपूर्वी आकाश पानपत्ते या तरुणांचा कुख्यात सूरज कावळे याने माऊझर मधून गोळ्या झाडून खून केला होता शिवाय सुरजला कुख्यात राकेश गाडेकरचा गेम करण्याची सुपारी देण्यात आली होती तेव्हा पासून ते एकमेकांच्या मागावर होते काटा काढण्यासाठी संधी शोधत होते 27 डिसेंबर ला रात्रीच्या सुमारास राकेश गाडेकर व त्याचा मित्र निलेश डेअरिया सुरजला ठार करण्याच्या उद्देशाने गेले होते कार जळणारे तिन्ही आरोपी सुरजचे मित्र असून बदला घेण्याचा उद्देशाने निलेश डेअरया मोठा भाऊ अजय यांची कार जाळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अश्विन ढोणे हा माथेफिरू सराईत गुन्हेगार असल्याने त्याने झिंगरे व पठाण यांच्या कारला जुने वैनमस्व असल्याने पेट्रोल ओतून आग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भानेगावात दडून बसले होते आरोपीभानेगाव वार्ड क्रमांक 4 परिसरात आरोपी अनिलच्या घरी दडून बसले होते दुपारी 12 वाजता ते पौणिकर गल्लीतून कार जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी काही पोलीस दबा धरून बसले होते तर काही पाठलाग करीत होते मोठया शिताफीने मुख्य आरोपी अश्विनसह, अनिल, कुणाल यांना ताब्यात घेतले.

मौका लावण्याची मागणीपरिसरात दिवसेंदिवस गुन्हे वाढीस येऊ लागले आहेत कार्यवाही होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे स्थानिक राजकीय नेत्यांसह व्यापाऱ्यांनी मौका लावण्याची मागणी केली आहे.

खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात अश्विन होता फरारएका वर्षासाठी आरोपी अश्विन याला तळीपार करण्यात आले आहे दरम्यान मागील दोन तीन महिन्यांपूर्वी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात खाजगी सुरक्षा रक्षक मंगेश गजभिये याला अश्विनने ठार मारण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्यापासून अश्विन फरार होता मात्र कार जाळल्या प्रकरणात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.