সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 27, 2018

गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार

 पुसेसावळी : (ता.खटाव जि. सातारा)खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडीतील साताबिगे शिवारातील खिलार गाईचा बिबट्या कडुन ठार करुन फस्त करण्याची घटना सोमवार रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास घडली असल्यामुळे या गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती वरुन गिरिजा शंकरवाडीतील शेतकरी यशवंत विष्णु थोरवे यांच्या मालकीची असणारी सातबिगे शिवारामध्ये खिलार जातीची गाय व इतर जनावरे बांधलेली होेती, नेहमीप्रमाणे ते गावामध्ये घरी जेवण करण्यास आले होते, तद्नंतर ते त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या मालकीची गाई दिसुन आली नाही म्हणुन आजुआजुच्या क्षेत्रामध्ये बॅटरीच्या प्रकाशझोतात प्राण्याचे डोळे चमकल्याचे दिसुन आले म्हणुन त्यांनी आरडाअोरडा करुन तो वन्याप्राणी घटनास्थळाच्या उत्तरेस पळुन गेला, त्यानंतर घाबलेल्या अवस्थेमध्येच ते बाकीची जनावरे घरी गेले.

आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचनामा करण्यास आलेली वनअधिकारी व ग्रामस्थ यांनी पाहणी करत असताना गाईच्या तोंडाला पंजा मारलेले अोरखडे दिसत होते व मानेच्या मागील भागातील काळीज व फुफ्फुस नसलेले दिसुन आले त्यावरुन ते वन्यप्राण्यानेच खाल्ले आहे, तसेच या गाईचे बांधलेल्या ठिकाणापासुन ९ मी.अंतरावर गाई अोढत नेल्याचे दिसुन आले तसेच मृत शरिरापासुन ४मी.अंतरावर रक्ताचे डाग दिसत असुन सदर जागेत बारकाईने तपास केला असता काही ठसे दिसुन आले या ठश्यावरुन गाईवर हल्ला करणारा वन्यप्राणी बिबटा असावा असे दिसुन येत आहे. सदर घटनास्थळावरुन कोरेगाव वनपरिक्षेत्राची हद्द उत्तरेस ५००मी.व पश्चिमेस २०० मी.एवढ्या अंतरावर आहे. तरी सदर वन्यप्राणी हा कोरेगाव वनहद्दीत असावा असा अंदाज आहे. त्यामूळे या साताबिगे शिवारात जाण्यास शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

गेल्या पंधरादिवसापासुन सातबिगे शिवारातमध्ये शाळु हरभरा पिके आहेत त्या पिकांची काळवीट डुकरे नासधुस करित असल्यामुळे मी व पाळीव जनावरे या शेतातच थांबत होतो. परंतु काल अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे २५ ते ३० हजार रुपये किंमतीची असणार्‍या गाई ठार झाली, मुला प्रमाणे मी या जनावरांची देखभाल करत असल्यामुळे हा माझ्या कुटुंबावर मोठा आघात आहे. - श्री.यशवंत विष्णु थोरवे, शेतकरी 

काल रात्रीच्या वेळी आमच्या गावातील यशवंत थोरवे यांची गाय बिबट्याने ठार केल्याची बातमी गावभर पसरली आणि गावामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने याबाबत ठोस अशी उपाय योजना करावी. आणि जनावराच्या जिवावर झालेल्या हल्लात मृत झालेली गाईची भरपाई त्या शेतकर्‍याला लवकरात लवकर मिळावी,- श्री.बापुसो थोरवे ( माजी सरपंच गिरिजाशंकरवाडी)


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.