ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे अर्थमंत्री
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी म्हाडा ला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ऑटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्वास आल्यामुळे महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनतर्फे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या ऑटोरिक्षा चालकांच्या मागणीचा अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात 20 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा कॉलनीतील घरे 4.50 लाखापर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अधिका-यांना दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन चंद्रपूर येथील आरक्षण क्रमांक 79 व 80 मौजा कोसारा येथे ऑटोरिक्षा चालकांकरिता नागपूर मंडळातर्फे प्रस्तावित घरकुल योजनेबाबत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सदर सदनीकांची किंमत रूपये 7,56,000/- प्रती सदनिका अशी दर्शविण्यात आली असून सदर किंमत रूपये 4.50 लक्ष इतकी करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा चालकांनी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने रेटली होती. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर मागणी पुर्णत्वास आली असून आता ऑटोरिक्षा चालकांना सदर घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्ध होणार आहेत.
सदर मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष बळीराम शिंदे, उपाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, जहीर शेख, जाकीर शेख, रविंद्र आंबटकर, विनोद चन्ने, राजू मोहुर्ले, रमेश मुन, अनिल मिसाळ, हरीभाऊ नागपूरे, दिलीप कलोडे, प्रशांत वानखेडे, विलास बावणे, किरण मस्कावार, किशोर राजबोईनवार, मारोती दानव, महादेव करंबे, तुळशिराम वालकोंडावार, सुरेश क्षिरसागर, परमेश्वर सरकार, सचिन बगड, राजेश तिराणकर, सतिश गोरघाटे, रामचंद्र गुंजेकर, सुनिल पाटील, मंगेश चवरे, खुशाल आंबटकर, रमेश गोमासे, दिलीप ढवळे, विलास जुमडे, परशुराम तुराळे आदींनी अर्थमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.