चंद्रपूर/प्रतिनिधी
प्रबोधन विचार युवा मंच च्या संयोजकांची बैठक संयोजक सुजित साठे(डब्लू सि एल, कर्मचारी) यांचे घरी झाली. 3 फेब्रुवारी 2019 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे बि. जि. कोळसे पाटील सर (माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय) यांचा जाहीर भव्य प्रबोधन कार्यक्रम युवकांच्या उपस्थित होण्याचा निर्धारही करण्यात आला
या बैठकीला कपिल सरदार (बँक मॅनेजर, एसबीआय चंद्रपूर ) यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करियर मार्गदर्शन करून युवांचा आत्मविश्वास वाढविला...जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा.. यश मिळेपर्यंत प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका असे सांगताना स्वतःचा अनुभवही सांगितला ...बिलिफ सिस्टीम वर विश्वास ठेवून कार्य करा असे आव्हानही कपिल सरदार यांनी केले.
प्रबोधन विचार युवा मंच चे मुख्य संयोजक विनोद आर सोनटक्के यांनी भारतीय संविधानाची 100% अमलबाजवणी झाली तर साऱ्या समस्या सुटतील..
म्हणून देश हितासाठी.. संविधानाची 100% अमलबाजवणी -यासाठी जनजागृती करणे ही युवकांचीच मुख्यता जवाबदारी आहे आणि युवकानी वैचारिक मार्गानेच क्रांति करून ,संविधानाची जागृती करून ,संविधानाची 100% अमलबाजवणी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे...असे म्हणाले..
पुढे बोलताना विनोद सोनटक्के म्हणाले :-..राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात **सबको शिक्षा सबको काम, ..देकर रहेगा भारत का संविधान** अशी तरतूद संविधानाच्या अनुच्छेद 45,21,41,47 केलेली असताना ही आजपर्यंतच्या सत्ताधारी वर्गाने भारतीय संविधानाची 100% अमलबाजवणी केलीच नाही म्हणूनच देशाचा सत्यानाश सुरू आहे... भुखमरी,बेरोजगारी, जातीवाद, धर्मवाद जिवंत असण्याचे एकमेव कारण म्हणजे ""संविधानाची 100% अमलबाजवणी झाली नाही हेच आहे...भारतीय संविधान हेच खरे स्वातंत्र्य आहे.. असे असतानाही संविधान बदलविण्याचा प्रयत्न सुरू आहे... तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांनी भारतीय संविधान समजून घेणे ..आणि त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जवाबदारी आहे असेही मुख्य संयोजक विनोद आर सोनटक्के म्हणाले....
बैठकीला श्रुती शेंडे, तृप्ती साव, संगीता बुरडकर, कोमल कुडकेलवार, विपुल रंगारी, बाबाजी आपटे, मनीष मेश्राम, सुरज दहागावकर, यश सोरते, विध्येय सोनटक्के,रोहित उंदिरवाडे, खुशाल काळे, व्यंकटी वाघमारे, स्नेहा दडमल, श्रावणी रामटेके, शीतल मेश्राम, अंशु पाटील, प्रफुल रंगारी, सुजित साठे, धनंजय पिंपळे, प्रेक्षा रामटेके, हर्षवर्धन कोठारकर,कबीर घोनमोडे, प्रेक्षित सुखदेवे, गिरीधर खोब्रागडे, देविदास दुधे..उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले...