प्रतिनिधी/ परभणी
पाथरी: -मराठवाड्यात सातत्याने कोरडा दुष्काळ पडत असून या मुळे पाण्याचा प्रश्न अतिषय गंभिर बनत चालला आहे. पाथरी तालुक्यात दक्षिण भागात दुष्काळाची तिव्रता अधिक असून वाघाळा येथिल ग्रामस्थांनी जन्मभूमी फाऊंडेशन ने गावात पाण्या साठी बंधारा बांधावा आम्ही सहकार्य करू असे सांगितल्याने या विषयी प्रशासकीय परवानगी मिळवल्या नंतर आता 22 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणीचे जिल्हाअधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते बंधारा कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमा साठी रोहयो उप जिल्हा अधिकारी स्वाती सुर्यवंशी,उविभागिय अधिकारी कोळी, तहसिलदार निलम बाफना, जिल्हाअधिक्षक कृषिअधिकारी शिंदे, बालकिशनजी चांडक, जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे पाटील, कोहिनुर कन्स्ट्रक्शन्सचे सय्यद गुलशेरखान मामा आदींची उपस्थिती राहाणार आहे. सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यांने जवळ पास दोनशे मिटर लांब आणि तीस फुट रुंद 10 ते 15 फुट खोली करण करून हा बंधारा तयार करण्यात येणार आहे. या मुळे या परिसरातील शेती सह गावचा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.या कामा साठी समाजातील संवेदनशिल मंडळी सामाजिक बांधिलकी म्हणून पुर्णत: मदत करणार असून शासनाच्या कोणत्याही अर्थिक मदती शिवाय जिल्ह्यातला अशा प्रकारचा मॉडेल ठरेल असा बंधारा आम्ही करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी सांगितले. या वर्षी दुष्काळ ही संधी समजुन जुन 2019 पर्यंत शेकरी हिताचे विविध उपक्रम प्रशासनाला सोबत घेत जनतेच्या आणि संवेदनशिल माणसांना सोबत घेत राबवनार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमा साठी वाघाळा ग्रामस्थ आणि शेतक-यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन सत्यमेव चयते शेतकरी बचतगट वाघाळा आणि जन्मभूमी फाऊंडेशन यांनी केले आहे.