সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 24, 2018

आनंदाश्रु, आठवणी आणि उत्साहासह ‘यादे-2018’ साजरा


     जी.एच.आर अकादमीचा पदवीदान समारंभ
नागपूर- आठवणी, आनंदाश्रु आणि मस्तीसह उत्साहामध्ये 2016 व 2017 सालात उत्तीर्ण झालेल्या जी.एच.आर. अकादमीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘यादे-2018’ पार पडला. शनिवार, 22 डिसेंबरला महाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत हजेरी लावली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कपूर यांचेसह उपप्राचार्य डॉ. संजय हरिदास, विविध विभागांचे विभागप्रमुख पंकज अग्रवाल, प्रा. आचल शहारे, प्रा. अमित पिंपळकर, प्रा. तुषार शेंडे, प्रा. अखिलेश उगले उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांशी बोलताना प्राचार्य डॉ. विवेक कपूर यांनी महाविद्यालयाद्वारे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. सोबतच अधिकाधिक संख्येत माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी जुळण्याबद्दल आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. महाविद्यालयातील गमतीजमती सांगत असताना पुन्हा हे दिवस येणार नाहीत, असे सांगत अनेक विद्यार्थ्यी भावूक झालेत.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. विवेक कपूर यांनी केले. यावेळी ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रा. प्रिया बावरिया यांनीही समायोचित भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन फारुक अहमद आणि ऋतुजा गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालायाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.गीतादेवी भास्कर आणि त्यांच्या चमूने विशेष प्रयत्न केले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.