সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 24, 2018

पद्मश्री आमटे दाम्पत्यांची चंद्रपूर किल्ल्याला भेट



इको-प्रो चे किल्ला अभियान ऐतिहासिक स्मारक संवर्धन व स्वच्छतेच्या दृष्टीने मार्गदर्शक  - डॉ प्रकाश आमटे

पद्मश्री डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट, हेरीटेज वॉक मध्ये सहभाग


चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी तसेच श्रमदानात सहभागी सदस्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आज पद्मश्री डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी चंद्रपूर किल्ल्यावर भेट दिली.

 इको-प्रो तर्फे सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास आता निमीत श्रमदानास 595 दिवस पुर्ण झालेले असुन किल्ला स्वच्छता सोबतच इको-प्रो चे जिल्हयातील इतर स्मारकांबाबत सुध्दा कार्य सुरू झालेले आहे. या अभियाना सोबतच जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभाग व्दारे जिल्हातिल ऐतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहे. या अभियानाची पाहणी करण्यास विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी भेट दिली असुन अभियानातील श्रमदान करणारे कार्यकर्ते यांचे मनोबल वाढविण्यास त्यांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच किल्ला अभियान जाणुन घेत अनेक नागरीक सुध्दा यामाध्यमाने ‘हेरीटेज वॉक’ मध्ये सहभागी होत आहे. आज या अभियानस्थळी पद्मश्री डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास भेट दिली. सोबतच यावेळी इको-प्रो संस्थेच्या मुख्य कार्यालयास सुध्दा सदिच्छा भेट देत संस्थेच्या वेग-वेगळया कार्याविषयी माहीती जाणुन घेतली.

‘चंद्रपूर शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संववर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असुन अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरेल असे आहे. या घाण आणि अस्वच्छता असलेल्या ऐतिहासिक किल्लाची स्वच्छता करण्याकरिता इको-प्रो ची युवक स्वंयस्फुर्तपणे समोर येतात, निरंतर हे अभियान चालवितात हे दुर्मीळ उदाहरण आहे. भारत देश महान आहे, हया देशाची गौरवशाली पंरपरा आहे, त्याची जतन करणे गरजेचे आहे यातुन अनेकांना प्रेरणा मिळते त्यामुळे या कार्यात युवकांनी सहभागी व्हावे, प्रत्येक चंद्रपूरकरांनी यात आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दयावे’ असे आवाहन यावेळी पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांनी केले. ‘चंद्रपूरात इको-प्रो सारखी संस्था स्थापन करून वेगवेगळया क्षेत्रात कार्य सुरू असुन हे अभिनंदनीय आहे. ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी इको-प्रोचे कार्य स्पृहनीय आहे. आजकाल लोक कचरा करायला तयार होतात मात्र कचरा साफ करायला कुणी तयार होत नाही. ही इको-प्रोची सर्वसामान्य कार्यकर्ते असुन एवढा मोठा किल्ला स्वच्छ करण्याचे आवाहन हाती घेतले, आणि निष्ठेने पार पाडला हे अभिनंदनीय असुन इको-प्रोच्या चळवळीला शुभेच्छा असल्याचे’ मत यावेळी पद्मश्री डॉ मंदाकिनी आमटे यांनी व्यक्त केले.

 आज सकाळी चंद्रपुर येथे येत इको-प्रो कार्यालयास भेट व इको-प्रो सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर आमटे दाम्पत्य यांनी बगड खिडकी येथील रामाळा तलावास लागुन असलेले बुरूजावर भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी किल्ला स्वच्छता अभियानाचे स्वच्छता पुर्वीचे व नंतरचे छायाचित्र दाखवित माहीती दिली. पुर्वीची परिस्थीती आता सुरू असलेले कार्याची माहीती देत बुरूज 4, 5, 6 व 7 पर्यत व बगड खिडकी ते मसन खिडकी असा किल्लावरून इको-प्रो सदस्यांसह फिरून हेरीटेज वॉक पुर्ण करण्यात आला. यावेळी किल्ला स्वच्छतेसोबतच पुरातत्व विभागाच्या मदतीने सुरू असलेले संरक्षण भिंत व त्यामधुन पाथवे, सायकल ट्रेक बाबत माहीती दिली. यावेळी संस्थेचे नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, नितीन बुरडकर, बिमल शहा, संजय सब्बनवार, मनीष गांवडे, सुमीत कोहळे, राजु काहीलकर, जयेश बैनलवार, प्रमोद मलीक, अभय अमृतकर, अमोल उटटलवार, अनिल अडगुरवार, हरीश मेश्राम, विनोद दुधनकर, आशिष मस्के, सचिन धोतरे, अतुल राखुंडे, सारीका वाकुडकर, आयुषी मुल्लेवार, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कण्डवार व अन्य सदस्य सहभागी झाले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.