काही प्रगतशील शेतकऱ्यांना बोलके केले असता त्यांनी सांगितले आपल्या तालुक्यात नेत्यांची कमीच आहे कारण काटोल नरखेड सावनेर या तालुक्याची आर्थिक मदार संत्रा व मोसंबी या पिकावर अवलंबून असल्याने त्यांची मुख्य पिकात गनना होउन हमी भाव नुकसान भरपाई पिक विमा दिला जातो परंतु भिवापुरव कुही तालुक्याची आर्थिक मदार या मिरची पिकावर अवलंबून असतांना या पिकाला सावनेर काटोल नरखेड तालुक्याच्या धर्तीवर आधार भुत बाजार भाव नुकसान भरपाई पिकविमा का देण्यात येवु नये असा प्रश्न नागपूर जिल्हा कांग्रेस महासचिव राजानंद कावळे यांनी उपस्थित केला
नागपूर जिल्ह्यातील भिवापुरी मिरची ही देशाच्या पटलावर बँटेड म्हणून गणल्या जाते मिरची या पिकांचे रोजच्या जेवनात अन्यन्य महत्त्व आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे
मिरची पिकाची अशीच अवस्था राहीली तर देशाच्या पटलावर असलेल्या भिवापुरी मिरचीचे ंनाव पुसल्या गेल्या शिवाय राहानार नाही व त्याच बरोबर दोन्ही तालुक्यातील मिरची लागवड नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती सुजाण नागरिकांनी व्यक्त केली