সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 27, 2018

स्नेह संमेलनातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

  • राजश्री मुंदाफळे यांचे प्रतिपादन 
  • द्रुगधामना हायस्कूल मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जंयती महोत्सव व स्नेहसंमेलन 

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
अभ्यासासोबतच अन्य उपक्रम घेतले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो . विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता अभ्यासासोबतच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्याकरिता स्नेहसंमेलनही तितकेच गरजेचे आहे . शिक्षण आणि कला एकाच नाण्याच्या दोन बाजु आहे असे प्रतिपादन डॉ .पंजाबराव देशमुख स्मृती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा राजश्री मुंदाफळे यांनी केले .
दवलामेटी येथील द्रुगधामना हायस्कूल , आदर्श कला, वाणिज्य, एच.एस.सी. व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने गुरूवार २७ डिसेंबर रोजी डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जंयती महोत्सव व वार्षीक स्नेह संमेलन झाले . त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या . सर्वप्रथम डॉ .भाऊसाहेब देशमुख व संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष शिक्षणरत्न प्राचार्य स्व .मधुकरराव मुंदाफळे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले . स्नेहसंमेलनाचे उदघाटन नागपूर विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक सतिश मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रोफेसर अॅन्ड फॉर्मर हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स, नागपूर विद्यापीठाचे डॉ .टी.एम. करडे, प्राचार्य डॉ . दिलीप गोतमारे, प्राचार्य सुरेंद्र मोरे प्रामुख्याने उपस्थित होते . या प्रसंगी विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम पुष्प सजावट , रांगोळी स्पर्धा , विज्ञान प्रदर्शनी , वर्ग सजावट , चित्रकला स्पर्धा , सलाद सजावट , बौद्धीक स्पर्धा , स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , गीत गायन स्पर्धा , प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम घेण्यात आले . प्रास्ताविक प्रा . सुरेंद्र मोरे व संचालन आरती भोरे यांनी केले . तर आभार वसंत हरले यांनी मानले . आयोजनासाठी प्रा .अविनाश चौधरी , प्रा . बाबुलाल मोरे, प्रा . दिलीप आजनकर , प्रा . गंगाधर ढगे, प्रा .नंदकिशोर भोयर , अरूण कराळे , कमल पुंड, पुष्पा सोमकुवर ,वैशाली लोही ,मालती बेले, प्रा . प्रगती पाचपोहर, प्रा . ज्योती किरणापूरे, प्रा . अविनाश बारब्दे, प्रा . गजानन काकड , प्रा .विलास मोहोड ,सुखदेव भिवगडे, लक्ष्मण खडसे, अशोक राऊत, प्रकाश मस्के आरती भोरे , ज्योती अढावू , सुनीता चव्हाण , वंदना मुसळे , मंदा फालके, वंदना जाभुंळकर , नरेंद्र शेळके ,विलास मुसळे ,विलास चौधरी , लक्ष्मण शिंदे, बंडू मोहोड , राजू शेळके , मंजु शिंदे ,नामदेव राऊत, शंकर राऊत आदींनी सहकार्य केले .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.