সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 06, 2018

मुदत संपल्यानंतरही सुरू आहे अवैद्य कॅन्टीन



चालकावर ३ लाख ४३ हजार १५४ रुपये थकीत वसुलीचाआदेश
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारासाठी हिंगणा एमआयडीसीतील सोनेगांव ( निपाणी ) येथील  डी ले -आऊट मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पाच वर्षाकरिता भारत रेस्टॉरेंट व हॉटेलचे संचालक भारत शर्मा यांना ५१ .३२   स्क्वेअर फिट जागा २००८ मध्ये टेंडर काढून ही भाड्याने दिली होती.नियमाप्रमाणे २०१३    पर्यंत ही जागा टेंडर नुसार भाड्याने होती  परंतु पाच वर्षे लोटल्यानंतरही विना टेंडर सतत पाच वर्षापासून कॅन्टीन अवैद्य सुरू आहे पाच वर्षाचे टेंडर संपल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन टेंडर काढणे गरजेचे असताना ते काढले नसल्याने कॅन्टीन मालक राजरोसपणे विनापरवाना पाच वर्षापासून भोजनालय चालवित आहे.
यामुळे एमआयडीसीचे लाखोरुपयाचे नुकसान झाले.यांमध्ये संबंधित विभागाचा हलगर्जीपणा किंवा अधिकारी व कॅन्टीनचा मालक याची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होते यासंदर्भात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जे . बी . संगीतराव यांना विचारलेअसता माहिती देण्यास टाळाटाळ करतात सामाजिक कार्यकर्ता सुनील हेरोल्ड यांनी एमआयडीसीचे विभागीय संचालक यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करूनही दोन वर्षापासून माहिती देण्यास किंवा योग्य कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने हेरोल्ड यांनी नागपूर ग्रामीण तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली केली असता तहसीलदारांनी दखल घेत विभागीय संचालक एमआयडीसी यांना ९ जून २०१७ ला नोटीस पाठवून कॅन्टीन मालक भारत शर्मा यांच्याकडे थकीत असलेली तीन लाख ४३ हजार १५४  रुपये भरण्यासंबंधी नोटीस देऊन सूचना केली परंतु सात महिने लोटूनही राशी भरल्या गेली नाही किंवा वसुलही केले गेल्या नाही.आजही कॅन्टीनअवैद्यरित्या सुरूआहे. 
करारनामानुसार मुदत संपूनही अवैधपणे काही राशि न भरता कॅन्टीन सुरू आहे हे अधिकारी व कॅन्टीनचा मालक यांच्यामध्ये साटेलोटे तर नाही ना?तसेच संबंधित विभागाच्या ही बाब कशी लक्षात आली नाही.हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. शंभर रुपयाच्या स्टॅम्पपेपर करारनामा लिहल्यानुसार  २५७५ रुपयाचे महिन्याचे भाडे ठरले होते आणि प्रत्येक वर्षी भाडेवाढ यानुसार २००८  ते २०११ वर्षाचे भाडे २५७५, २०१२  चे भाडे २८३३  व वर्ष २०१४ चे भाडे ३१२६ असे भाडे निश्चित करण्यात आले होते. 
संबंधित कॅन्टींग चालकाने डिसेंबर वर्ष  २०११ पर्यंतचे  भाडे भरले त्यानंतर सात वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे अदा केले नाही प्रतिमाह रुपये २५७५  याप्रमाणे जानेवारी ते एप्रिल २०१८  असे एकूण ७६ महिन्याचे भाडे एक लाख ९५  हजार ७०० रुपये व त्यावरील व्याज एक लाख ४७ हजार ४५४ रुपयेअसे एकूण ३ लाख ४३ हजार १५४  रुपये ७  दिवसाच्या आत वसूल करण्याचे निर्देश असतानाही संबंधितअधिकारी करू शकले नाही.तसेच एमआयडीसी विभागाने ही कॅन्टीन शर्मा याना भाडे तत्त्वावर चालवायला दिली असता शर्मा यांनी दुसऱ्याला भाड्याने दिल्याचेही माहिती पुढे येत आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.