वरोरा (तालुका प्रतिनिधी)शहरालगत असलेल्या फुकट नगर येथे शुल्लक वादावरून खून झाल्याची घटना घडली असून इंदिरानगर या भागातील हे दोन्हीही रहिवाशी आहेत .या भागात झोपडपट्टीत राहणारे नामदेव गोविंद रागीट वय 55 वर्षे याचा जागेवरच मृत्यू झाला. नामदेव रागीट हे शेळ्या राखण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या भागात करत होते. रोजप्रमाणे सकाळी 10.00वाजताच्या सूमारास शेळ्या घेऊन चरण्यासाठी जात असताना तिथेच राहणाऱ्या शैलेश चिकाटे यांच्या घराजवळ ही घटना घडली. या रोड वरून नामदेव रोज आपल्या शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात असताना या शेळ्या आजूबाजूचे कुंपण त्यामधील झाडेसुद्धा खात होती. त्यामुळे शैलेश मी लावलेले झाडेसुद्धा ह्या बकऱ्या रोज खात होत्या याचाच राग येऊन काही वेळा यांचे वाद निर्माण झाले होते. परंतु आज शेळ्यांनी शैलेश चिकाटे यांनी लावलेले फुल झाडे व मैदीचे झाड खाल्ल्याने वाद सुरू झाला. शैलेश यांचा राग अनावर झाल्यानंतर त्याने त्याच ठिकाणी असलेल्या लोखंडी सबलेने नामदेव यांच्या डोक्यावर वार केला यामध्ये नामदेव जागेवरच मृत्युमुखी पडला.वाद सोडवण्याच्या अगोदरच नामदेव यांचा मृत्यू घटनास्थळीझाला . त्यामुळे या परिसरात शोकाकुल वातावरण पसरले असून आरोपीने स्वतःच पोलीस स्टेशन वरोरा येथे पोहोचून सरेंडर केले. नामदेव यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी नेला असून पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरण ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ ...
– अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार* पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिटचे लोकार्पण आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची पण आता आसाम नंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणा-या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासी बहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातुन रोजगार निर्मीतीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात विकासकामांसह रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक 21 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट च्या लोकार्पण सोहळयाच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभु...
गडचिरोली - गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. त्याने नक्षल्यांच्या विविध दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे त्याची अटक हा नक्षल्यांसाठी मोठा हादरा आहे. दरम्यान रामन्नासह त्याची पत्नी पद्माला शनिवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नक्षल चळवळीत सेवा देणा-या रामन्ना व पद्मा या दाम्पत्याला शुक्रवारी पहाटे गडचिरोली पोलिसांच्या सूचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकावर अटक झाली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दुपारी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रामन्ना शस्त्रास्त्र बनविण्यात आणि ते चालविण्यात पारंगत होता. त्यामुळे त्याला अनेक दलममध्ये नक्षल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविण्यात आले होते. दंडकारण्य कमिटीशिवाय त्याने कोंडागाव, माल, टिपागड, अहेरी आणि बस्तरच्या जंगलात नक्षल दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते....