সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 05, 2018

अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाड

अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले
वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा शहरातील नामांकित प्रॉपर्टी डीलर  सिद्धार्थ ढोके यांच्या तीन प्रतीष्ठानावर व घरावर अवैध सावकारी विरुद्ध सहकार विभागाने गुरुवारी सकाळच्या सुमारास धाड टाकली.मिळालेल्या माहिती नुसार येथील एका शेतकऱ्याने सहकार विभागाला ही तक्रार केल्याने हे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केली.  सावकारी पनाचा कोणताही  परवाना नसतांना व्याजाने रक्कम देण्याचे काम येथील प्रॉपर्टी डीलर  सिद्धार्थ ढोके   करत होते. व्याजाने पैसे देऊन त्यावर व्याज आकाराची तक्रार व परस्पर विक्रीच्याही तक्रारी सहकार विभागाला मिळाल्याने  जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनाखाली ही धाड भद्रावती,वरोरा ,बल्लारपूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थायांचे कडून चोख पोलीस बंदोबस्तात सदर धाड टाकण्यात आली.
यात चौकशी अधिकाऱ्यांनी सही घेतलेले कोरे मुद्रांक पेपर यासह काही आक्षेपार्ह विक्रिपत्र देखील आढळून आल्याने चौकशीला आणखी वेग येणार असल्याचे समजते ,  या आधीही सिद्धार्थ ढोके यांच्यावर कलम ४२० अंतर्गत वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असल्याच समजते . या तक्रारी अंतर्गत सहकार पथकाला आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाले असून त्याचा पुढील तपास चंद्रपूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार मागील काही वर्षापासून वरोरा शहरामध्ये फोफावत होता.पैश्याची आवश्यकता असलेल्या गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी कमी भावात ठेऊन घेऊन त्यावर विक्री करून घेत असल्याचा प्रकार सुरु होता. व पैस्याची परतफेड करायला आलेल्या शेतकऱ्यांकडून जास्त पैस्याची मागणी करत होता.व तेवढी रक्कम नसल्यास  पेपरवर लिहिलेली मुदत संपल्याने ती जमीन हडप केल्या जात होती. असा आरोप करण्यात आला होता.  या पद्धतीचे बरेचसे कागदपत्र सहकार विभागाच्या हाती लागल्याने अवैध सावकारी करणाऱ्या सिद्धार्थ ढोके यांची कसून चौकशी करण्यात आली.
पुढील अहवाल सहकार विभागातर्फे  पोलीस विभागाला देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे  चौकशी अधिकारी सुनील नवघरे सहाय्यक निबंधक यांनी सांगितले.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अशा अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले असून यात बरेच मोठे मासे फसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यात सहकार विभागाला कोणते कागदपत्र मिळाले आहे हे मात्र अद्यापही समजू शकले नाही. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.