সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 06, 2018

या तीन वर्षाच्या ब्रिलीअंट बॉयचा विडीओ बघून तुम्हीही व्हाल थक्क;बघा काय आहे नेमक

चंद्रपूर/ललित लांजेवार: 
लहान वयातच काही मुलांमध्ये असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक दिसून येते.  त्याची हुशारी भल्याभल्यांना थक्क करून सोडते.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावात राहणाऱ्या कैवल्य अमोल भोयर या तीन वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या सामान्य ज्ञान आणि स्मरणशक्तीच्या जोरावर भल्याभल्यांना आश्चर्यचकित करून सर्वांच्या भुवया उंच करावयास भाग पाडले आहे. 
तीन वर्षांचे वय हे खेळण्या-बागडण्याचे असते मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावातील कैवल्य अमोल भोयर याला अपवाद ठरले आहे,     इतक्या कमी वयात त्याला शहरातील,  जिल्ह्यातील,    देशातील राज्यातील     प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय खेळ ,फुल,प्राणी ,लोकप्रतिनिधी, जिल्हापरिषद सदस्य ,यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टीचे नाव त्याला तोंडपाठ आहेत. एकदा सांगितलेली कोणतीही माहिती त्याला तुम्ही विचार तो तुम्हाला नक्की सांगणार. 
जी वय मुलांची खेळायची असते अश्या वयात कैवल्यला जनरल नॉलेजसोबत मैत्री करावी लागली.कैवल्य याला दररोज घडणाऱ्या घटनांची व नवनवीन माहिती जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्याचे आई-वडील देखील त्याला माहिती देण्यचा प्रयत्न करत असतात.कैवल्यचे वडील हे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत,तसेच त्यांचा मोबाईल दुरुस्तीचे काम देखील आहे,व कैवल्यची आई वैशाली अमोल भोयर ह्या नांदा या गावच्या पोलीस पाटील आहेत.आई वडील या दोघांचेही शेडूल अतिशय व्यस्ततेचे असतांना देखील कैवल्यला वेळात वेळ काढून संपूर्ण जनरल नॉलेज सोबत घडणाऱ्या रोजच्या नवीन घटनाची माहिती त्याला देत असतात.यात त्याला चित्राच्या माध्यमातून देखिल ओळख करून दिली जाते.ज्यात त्याला माहिती जाणून घेण्यास मदत होते.
सध्या कैवल्य शाळेत जात नसला तरी देखील तो लवकर प्रत्येक गोष्ट आत्मसाद करतो येणाऱ्या अभ्यास वर्षात त्याचा चांगल्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे  त्याच्या वडीलांने सांगितले. 
                          चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण सोशल मिडीयावर कैवल्याचा विडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. युटूबर "नादखुळा" या च्यानेल ने या कैवल्याच्या हा विडीओ अपलोड केला असता त्याला ४ लाख ७२ हजारलोकांनी बघितले असून हजारो लाईक सोबत प्रशंसनीय कमेंट्स सुद्धा आहेत.हा संपूर्ण विडीओ त्याच्या वडिलांनी रेकॉर्ड केला आहे .व हा विडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून लोक त्याला पसंती देखील देत आहेत.  यावरून कैवल्याची स्मरणशक्ती किती जोरदार आहे हे या विडीओ माध्यमातून दिसून येत आहे.कैवल्यच्या या यशस्वी वाटचालीवरून देशात नक्कीच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे.    

इतक्या कमी वयात हे सगड कैवाल्यने कसे काय केले या बाबद माहिती जाणून घेतली असता त्याचे वडील अमोल भोयर म्हणाले,आम्ही सर्वप्रथम घरात तस वातावरण निर्माण केले कि कैवल्यला आपण अश्या प्रकारची माहिती देता येईल व त्याला एखाद्या गोष्टीबाबाद माहिती दिली कि तो लवकर त्याला आत्मसाद करतो त्यामुळे आम्हाला दुसर्यांदा सांगायची गरज भासत नाही आणि मुख्य म्हणजे घरचे वातावरण याला कारणीभूत ठरले जे आम्ही निर्माण केले.  अमोल भोयर                                                                                             कैवल्यचे वडील  
अभ्यास करतांना कैवल्य 
कैवल्य आपल्या आई वडिलांसोबत 

                                                                                   





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.