সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 04, 2018

रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या:अहीर

नागपूर येथे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:- 
भारतीय रेल्वे सेवा प्रवास सेवेतील एक प्रमुख सेवा आहे. यात दररोज लाखो लोक प्रवास करत असुन त्यांच्या योग्य सोयीसुविधांची व सुरक्षीततेची जबाबदारी ही रेल्वे प्रषासनाची आहे. रेल्वेत व स्थानकावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू असुन त्या कामांना गती देत कामे तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देष केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी दिले.

नागपूर येथील रवि भवनात नागपूर रेल मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यासोबत बैठक पार पडलेल्या बैठकीत मध्यरेल्वेचे मंडळ रेल प्रबंधक उत्पल दत्त व इतर रेल कमिटी सदस्य दामोधर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार आदी उपस्थित होते.माजरी येथील स्थानक हे आदर्ष रेल्वे स्थानक निर्मीत करणे, बल्लारषहा स्थानकावर स्त्री व पुरूशांसाठी वेगवेगळे उच्च वर्ग प्रतिक्षालय, विषेश अतिथी कक्ष बांधकाम, सर्व रेल्वे फलाटावर आधुनिक दर्जाचे एल.ई.डी. कोच दर्षक बसविणे, प्रत्येक फलाटावर स्वतंत्र वाॅटर कुलर, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त फुट ओव्हर ब्रिज, चंद्रपूर व बल्लारशहा रेल्वे स्थानकांवर जुन्या फुट ओव्हर ब्रिज जवळ लिप्ट ची व्यवस्था, प्लाॅटफार्म सरफेस सुधारणा, यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील कायर व लिंगती येथे प्लॅटफार्म षेल्टर इत्यादी कामे मंजुर झाली असुन काही कामांना सुरूवात देखील झाली आहे.
चंद्रपूर स्थानकांवरील मालधक्का परिसराचे सिमेंट काॅंक्रीटीकरण करणे व प्रकाश वाढविण्यासाठी जास्त प्रकाश क्षमतेचे लाईट बसविण्यासाठी सुचित केले. चंद्रपूर स्थानकावरील साधारण तिकटी खिडकीच्या वेळेत बदल करून सकाळी 5.00 ते रात्रो 01.00 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी च्या विशयावर चर्चा करून करण्यात आली. ’आनंदवन एक्सप्रेस’ (गाडी क्र. 22127) ही लोकमान्य टिळक टर्मीनल मुंबई येथुन दु. 03.00 वाजता सोमवार ऐवजी बुधवार किंवा गुरूवारला सोडण्याची सुचना यावेळी बैठकीत ठेवण्यात आली. नंदिग्राम एक्सप्रेसचे 06 डब्बे वाढवुन बल्लारषहा येथुन सुरू करण्यासाठी ना. अहीर यांचेकडुन सतत पाठपुरावा सुरू असुन सदर डब्बे वाढविण्यासाठी रेल्वे प्रषासनाकडुन सकारात्मकता दर्शवित लवकरच ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आरक्षण खिडकी पुर्णवेळ सुरू ठेवण्यासाठी विशयावर चर्चा करून रात्रो 10.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी रेल्वे प्रषासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानक चांदा फोर्ट ला जोडण्यासाठी सर्वे पुर्ण झाला असुन लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून कडुन सांगण्यात आले. काजीपेठ - पुणे गाडीची वाढती प्रवासी संख्या बघता पुन्हा 06 डब्बे जोडण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (मध्ये रेल) यांच्या स्तरावरून कार्यवाही सुरू असुन षिघ्र गतीने यावर कार्यवाही होणार असल्याचे उपस्थितीत अधिकाऱ्यांकडू आश्वासित करण्यात आले. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विषयांवर रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सुचना ही दिल्या.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.