चंद्रपूर /प्रतिनिधी:
जीवनातील व्यथांचेे उत्तर राम कथेत आहे,मनुष्य जीवन निश्चतच अमुल्य आहे, मनुष्य जीवन अनेक व्यथामुळे कठिण वाटते.या व्यथा नष्ट करण्याचे उत्तर श्री रामकथेत आहे,असे प्रतिपादन पूज्य संत मुरलीधरजी महाराजांनी केले यांनी राम कथा महोत्सव च्या दुसऱ्या दिवशी कथा सांगतांना केले.
स्थानिक चांदा क्लब ग्राउंडवर श्री राम सेवा समिती तर्फे 9 दिवसीय राम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते.
कथेच्या प्रारंभी आयोजक रघुनाथ मुंदडा परिवाराच्या हस्ते श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सामुहिक हनुमान चालीसा पठण करून श्री मुरलीधरजी महाराज यांनी कथेला सुरुवात केली.उपस्थित
शेकडो राम भक्तांना राम कथा सांगतांना ते म्हणाले, मनुष्य जीवन परमेश्वराला मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे,पाप आणी पुण्य हे मनुष्य करू शकतो या जीवनात विवेकाचा उपयोग करतो, प्राणी असे करू शकत नाही त्यामुळे मनुष्य जीवनात हरी नाम स्मरण करावे. या जगात राम नामच आपले सर्व काही आहे, बाकी सर्व या जगात राहून जाईल. जे आपले नाही त्या मागे न धावता राम नामाचा जप कामी येईल. प्रति स्पर्धेत लोक धनाच्या मागे लागले आहे, परंतू जीवनात धन कामी येत नाही ज्याच्या जवळ धन आहे तो भजन करू शकत नाही,भजन करण्यासाठी मन पाहिजे.
संपत्ती सोबत येणारे सुख तो परियंतच असते, राम स्मरनाणी येणारे सुख चिरकाल टिकते. असा संदेश महाराजांनी आपल्या प्रबोधनातून दिला.
आयोजनात योगदान देणारे कैलास सोमाणी, गौरीशंकर मंत्री, संजय बनकर, राजू माहेश्वरी, दिलीप राठी, राजू बंग, हरीश सोमाणी यांचा मुरलीधर महाराज यांचे हस्ते सम्मान करण्यात आला अशी माहिती समितीचे सुनील तिवारी यांनी दिली. दुसऱ्या दिवशीच्या ही कार्यक्रमाला राम भक्तांनी प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद देत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.