चंंद्रपूर:प्रतिनिधी:
ज्या ठीकाणी दान देण्याची गरज आहे. तेथे न मागता आपण दान केले पाहिजे. जर कोणी गरजवंत आपल्याकडे मागण्यासाठी आला आपण त्याला मदत केली तर ते दान नाही,तो दया भाव आहे. दया आणि दान मधील फ़रक ओळखणं जरुरी आहे, असे प्रतिपादन पूज्य मुरलीधरजी महाराज यांनी केले. चांदा क्लब ग्राउंड येथे सूरू असलेल्या नऊ दिवसीय रामकथा महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ते बोलत होते.
मुरलीधरजी महाराज पुढे म्हणाले, खोटं बोलून, कपट करून कमवलेले धन कधी सुख देऊ शकत नाही. कलयुगात सत्य,तप आणि वैराग्य दुर्मिळच झाले आहे, पुण्य कमविण्यासाठी दान केले पाहिजे. दान दिल्यावर त्याची प्रशंसा ऐकणं ही बरोबर नाही.
पूज्य मुरलीधरजी महाराजच्या हस्ते डॉ. सुशील मुंदडा, मोहन महाकाळे, राजगोपाल तोष्णीवाल, अनुप गांधी, पियुष माहेश्वरी, महावीर मंत्री राजकुमार अग्रवाल, शिव जाजू, शितल जैन, हनुमान अग्रवाल यांचा सम्मान करण्यात आला.
आज राम- जानकी विवाह प्रसंग
राम कथेच्या सहाव्या दिवशी राम जानकी विवाहाचा प्रसंग उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. श्रीराम कथा आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण तिवारी, ओम सारडा, शिव सारडा, रोडमल गेहलोत, सुरेश अग्रवाल, ब्रजमोहन मुंदडा, रामकिशोर सारडा, रमेश मुंदडा ,विनोद उपाध्याय, कुंजबिहारी परमार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.