८ दिवस चालणार कार्यक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान भव्य श्री रामकथा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे आहे.शनिवारी 24 नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य शोभायात्रेने या रामकथेला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरातून दुपारी 12.30 वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला.
या शोभायात्रेत विशेष आकर्षण हे अग्रभागी धर्मध्वजा धारण केलेले दोन अश्वस्वार युवक गुंजन व्यास आणि कौशिक व्यास हे होते.सोबतच शोभायात्रेत मातोश्री विद्यालय येथील पन्नास मुलींचा लेझीम पथक, भजन मंडळ, तर शेकडो मंगल कलशधारी महिला, श्री राम लक्ष्मण जानकीची हुबेहूब झाकी सर्वांचे लक्ष वेधत होती. कथा प्रवक्ता श्री संतमुरली धरजी महाराजांच्या सुंदर रथा पुढे शेकडो धर्म प्रेमी स्त्री-पुरुष शिस्तबद्ध पणे शोभायात्रेत चालत होते. या सोबतच हनुमानजींहि झाकी हि या शोभेयात्रेत विशेष आकर्षण ठरली. हि दिव्य शोभायात्रा वाजत-गाजत अयोध्या धाम चांदा क्लब मैदानावर पोहोचली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीमती किसनी देवी मुंदडा,ब्रिजमोहन रघुनाथ मुंदडा परिवार,समितीचे अध्यक्ष श्री सत्यनारायण तिवारी, मुख्य यजमान श्री मोतीलाल अग्रवाल यजमान श्री ओमप्रकाश अग्रवाल, सुरेश अग्रवाल, मुरलीमनोहर व्यास, यांनी श्री रामायण पूजन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम आठ दिवस चालणार असून दररोज विविध कार्यक्रम कथांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी आयोजन समितीचे पदाधिकारी शीर रोडमोल गोहतोल,श्री अभय अग्रवाल. ओमप्रकाश सारडा, सुरेश राठी,गोपीकिसन पोद्दार,मुन्ना बाबू बांगला,पंकज मंदडा,पुनमचंद तिवारी, ललित कासट,राजगोपाल बंग,श्रीकांत भट्टळ,प्रदीप माहेश्वरी,जुगल किशोर सोमाणी,सुधीर बजाज,राजेश काकाजी, पंकज शर्मा, सुनील तिवारी, मनोज जाजू,निशांत भट्टळ, राजू व्यास,संजय वनकर,ऋषिकांत जाखोरीया, रुपेश राठी यांनी विशेष परिष्करम घेतले,तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पत्रकार श्री मुरली मनोहर व्यास यांनी केले.