चंद्रपूर/प्रतिनिधी:
जगात क्षमता नसलेले काही लोक गुरू बनून फसवेगिरी करीत आहे, अश्या गुरूपासून महिलांनी सावध राहिले पाहिजे, असे चिंतन पूज्य मुरलीधर जी महाराज यांनी व्यक्त केले.
स्थानिक चांदा क्लब ग्राउंड वर श्री राम सेवा समिती तर्फे आयोजित ९ दिवसीय राम कथा महोत्सव च्या तृतिय दिवशी प्रवचन सांगत होते.
कथेच्या प्रारंभी आयोजक रघुनाथ मुंदडा,एकनाथ, उत्तमराव पाटील परिवार च्या हस्ते श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पूजन करण्यात आले .
महाराज पुढें म्हणले की,दवंडी देऊन शिष्य बनवणाऱ्या फसव्या गुरू पासून सावध असले पाहिजे. विशेषतः महिला वर्ग भावनीक असतो त्यांनी तर गुरु बनवून च नये. या जगात कोणी गुरू आपलं पुण्य कोणत्याही शिष्याला देऊ शकत नाही. आपण आपले पुण्य स्वतः संचित केले पाहिजे. आपल्या कर्मा वर विश्वास ठेवावा, मंत्र देऊन गुरुं नाही बनू शकतो. सत्कर्म करावे. या वेळी किशन लाल चढा, विनोद मणियार, सज्जन कुमार। अग्रवाल, प्रदीप माहेश्वरी, मुन्ना बांगला, सौ गायत्री सुमेध कोतपल्लीवार, सुधीर बजाज,ऋषिकेश जखोटीया, रामानंद राठीं, राजेश काकाणी, नवीन अग्रवाल, कमलेश विजयवर्गीय, पवन अग्रवाल सुनील गुप्ताना सन्मानित करण्यात आले. अशी माहिती सुनील तिवारी यांनी दिली.