/
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक राजेश शिरसाठ यांना लाच घेताना पुण्यात अटक
चंद्रपूर , पुणे प्रतिनिधी : चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तसेच सध्या नाशिक येथे आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश शिरसाठ(48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथे दोन लाख रुपयाची लाच घेताना अटक केली. ते चंद्रपूरमध्ये 2012 ते 14 दरम्यान कार्यरत होते.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना शिरसाठ यांनी अनेक प्रकरणे हाताळली होती. यात काही अधिकाऱ्यांचीही प्रकरणे होती. मात्र यातील काहींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली तेव्हा शिरसाठ तसेच तपास यंत्रणेवर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यामुळे निष्पक्ष चौकशी न करता ते लाच प्रकरणात अधिकारी कर्मचाऱ्यांना अडवित होते का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिरसाठ यांची बदली झाली. त्यानंतर ते नाशिक आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र एका प्रकरणात पुण्यात वारंट न बजावण्यासाठी त्यांनी एका हवालदारामार्फत तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी त्यांना तसेच हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
चंद्रपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी काही अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणामध्ये केस दाखल केली होती. यातील काही प्रकरणांचा न्यायालयाने निपटारा केला असून अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली आहे. विशेष म्हणजे, निकालावेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपाधीक्षक शिरसाठ यांच्यासह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. दरम्यान आता शिरसाठ हे स्वतःच लाच प्रकरणात अडकल्याने त्यांच्या चंद्रपूर येथील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करणारा अधिकारीच लाचेच्या प्रकरणात अडकल्याने सध्या चंद्रपूरसह राज्यात चर्चेला उधाण आले असून त्यांच्यावर कडक कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.