मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):
भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६९ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

याच संविधान दिनानिमित्त विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवनी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय यादव यांच्या हस्ते पवनी वकील संघाला अॅड महेंद्र गोस्वामी यांनी भेट दिलेला"भारतीय संविधान" हा ग्रंथ प्रदान करण्यात आला.याप्रसंगी माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी संविधान निर्मिती मध्ये छान.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सह न्यायाधीश सपना पाटील, अॅड महेंद्र गोस्वामी, अॅड देशमुख, अॅड भुरे, अॅड सावरकर, अॅड अंबादे, अॅड कावळे, अॅड जिभकाटे, अॅड शेंडे सह कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अॅड मंगेश गजभिये यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. बावने यांनी केले.