সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 30, 2018

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये: मुरलीधरजी महाराज

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये: मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये .एकदा रागाच्या भरात माणसाचा मनावरचा संयम सुटला तर त्यामुळे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात. क्रोध जेव्हा येतो माणसाला त्यावेळेस शांत राहून काम केल्यास ते काम यशस्वी होऊ शकते. क्रोधात केलेले काम कधीही यशस्वी होत नाही. असे प्रतिपादन श्री राम कथा वाचक मुरलीधर जी महाराज यांनी चांदा क्लब येथे आयोजित श्री रामकथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी केले.

पूज्य मुरलीधर जी महाराज यांच्या हस्ते महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, निर्दोष बाबू पुगलिया विश्व हिंदू परिषदचे रमेशजी बागला, सचिन तिवारी,ललित व्यास,अनुप काबरा, यांचा सन्मान करण्यात आला.

आदिवासी वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवा

आदिवासी वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवा

- आमदार नानाजी शामकुळे यांचे मंत्र्यांना निवेदन
- प्रवेश क्षमता २०० वरून प्रत्येकी ५०० करण्याची मागणी


चंद्रपूर/प्रतिनिधी
आदिवासींना शिक्षणा
च्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली. मात्र, विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी असल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील शासकीय आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांची प्रवेश क्षमता २०० वरून प्रत्येकी ५०० करण्यात यावी, अशी मागणी आमदार नानाजी शामकुळे यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सावरा यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल असून, ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्थानिक स्तरावर उच्च शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता चंद्रपूर शहरात यावे लागते. येथील रुमभाडे आणि भोजन व्यवस्थेचा खर्च झेपत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात़आदिवासी समाजाचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन प्रगतीपदावर पोहचावा, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय निवासी वसतिगृहाची सोय करण्यात आली. परंतु, या शासकीय वसतिगृहाची प्रवेश क्षमता मुला-मुलींसाठी एकूण ४०० आहे. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, या ठिकाणी शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी व विद्याथीर्नीं या ठिकाणी शिक्षणाकरीता येतात. ही संख्या लक्षात घेता चंद्रपूर शहरातील शासकीय आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांची प्रवेश क्षमता २०० वरून प्रत्येकी ५०० करण्यात यावी, अशी मागणी आमदार शामकुळे यांनी केली आहे.
गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील लिफ्टचे काम सुरु करा:ढेंगरे

गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील लिफ्टचे काम सुरु करा:ढेंगरे

मनोज चीचघरे/(पवनी)भंडारा:

 गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, उन्हाळी धानपीकासाठी उजव्या कालव्यातुन पाणी पुरवठा केला जाणार आहे, कन्हाळगाव व भुयार क्षेत्रातील सर्व शेती सिंचनापासुन वंचित आहे, या क्षेत्रातिल शेती सिंचनाखाली आनण्यासाठी गोसेखुर्द्च्या उजव्या कालव्यावरील प्रस्तावित लिफ्टचे काम सुरु करावे, अशी मागणी पंचायत समिती सभापति बंडू ढेंगरे यांनी केली , उजव्या कालव्यातुन पाणी उपसा करण्यासाठी दोन लिफ्ट मंजुर करण्यात आलेल्या आहेत, परंतु लिफ्टचे काम अद्याप सुरु झालेले नाही, केंद्र व राज्य सरकार पुरेसा निधी उपलब्ध करुन देत नाही त्यामुळे लिफ्टचे काम प्रलंबित आहे, केंद्र सरकार निधी द्यावा यासाठी पंचायत समिती सभापती  बंडू ढेंगरे यांनी परीसरातील सरपंचाना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंची भेट घेऊन निवेदन दिले, वन्यजीवाचे संरक्षण  व शेतशिवारात वंन्यजीवापासुन होनारा त्रास कमी करण्यासाठी उजव्याचे जंगलाकडील बाजुला तारेचे कुंपंण घालण्यात यावे अशी मागणी त्यानी त्यांवेळी केली. 
रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

रागाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

उमेश तिवारी/कारंजा(घा):

  कौटुंबिक भांडणात पतीचा राग अनावर होऊन त्याने कुर्हाडीने पत्नीचा खून केल्याची घटना  गुरुवारी  सकाळी ११ च्या दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापनी (टॉवर) या गावी घडली. मृतक पत्नीचे नाव सौ.संध्या केशव भस्मे वय ३२ वर्ष असे आहे. घटने नंतर पती केशव भस्मे हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. मृतक महिला माहेर वर्धा जिल्ह्यातील खरागना येथील असून ती श्री.दिवाकर लाडे यांची कन्या आहे. तिचे लग्न ११ वर्षा पूर्वी झाले असून तीला २ लहान मुली आहेत. पती केशव भस्मे हा कारंजा येथील किराणा दुकानात नौकरी करीत होता. आज तो घर कामासाठी घरीच होता. मृतक सांध्यांचे वडील काही दिवसांपूर्वी जुनापाण्यात आले होते. ते शेतात होत. पती केशव भस्मे हा घरी कुराडीने काम करीत असतांना पत्नीसी वाद झाला त्याने तिच्या डोक्यावर कुराडीने एवढा जबर वार केला की तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने  जमिनीवर पडली. यात मुलीने आरडाओरडा केला.आजूबाजूच्या नागरिकांनी तिला कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसानी ताबडतोब कार्यवाही व पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी केली तिचा अंत विधी तिच्या माहेरी खरागना येथे होणार असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकर्यांनी घटने स्थळी भेट दिली असता त्यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास करीत आहे. पोलिसांनी ३०२ चा गुन्हा नोंदविला आहे.

परळीत गाडीच्या काचा फोडून पावणेतीन लाखाची बॅग लंपास

परळीत गाडीच्या काचा फोडून पावणेतीन लाखाची बॅग लंपास

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
परळी ,शहरातील देशमुखपार भागात  उभ्या केलेल्या स्कार्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या काचा फोडून गाडीत ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने  चोरून नेली  ही घटना दि 27 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली , या बॅग मध्ये पावणे तीन लाख रुपयाची रोकड होती तसेच बँकेचे चेक बुक होते.
                                                                                                    या चोरी प्रकरणी संजय किसनराव देशमुख यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणाचा तपास परळी  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे ते करीत आहेत.                                                                               परळीत गेल्या काही महिन्यात बॅग चोरी च्या घटना वाढल्या आहेत, आंबाजोगाईरोडवर घडलेल्या बॅग चोरीचा तपास अद्याप लागला नाही.  या शिवाय इतर बॅग चोरी घटनेचा तपास लागला नाही.
ताडकळस ग्रामपंचायत कार्यालयात ज्योतिबा फुले जयंती साजरी

ताडकळस ग्रामपंचायत कार्यालयात ज्योतिबा फुले जयंती साजरी

ताडकळस/प्रतिनिधी:
ताडकळस येथील ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त व संविधान सप्ताह निमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुनिताताई राजु पाटील आंबोरे , उपसरपंच खंडेराव वावरे , ग्रामविकास अधिकारी टाले , ग्राम पंचायत सदस्य तुकाराम आळणे , कैलास होनमणे , सुरेश मगरे ,  सौ.शिलाबाई रूद्रवार , सौ. सुजाता मगरे , सौ.तिलोत्तमा लासे , सौ.सरस्वती घोडके ,सौ.प्रयागबाई सलगर , शेख शिकुर , सौ.विजयाबाई आंबोरे , राजु पाटील आंबोरे , बालाजी रूद्रवार , राजेंद्र मगरे ,बि.जी. खरे , भोलानाथ जाधव यांच्या सह आदींची उपस्थिती .
पुर्णा तालुकाध्यक्षपदी गोविंदराव आवरगंड तर संपर्कप्रमुख पदी गोपाळराव आंबोरे

पुर्णा तालुकाध्यक्षपदी गोविंदराव आवरगंड तर संपर्कप्रमुख पदी गोपाळराव आंबोरे

निवडीचे ताडकळस परिसरात जोरदार स्वागत
ताडकळस / प्रतिनिधी:
ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी (ता. पुर्णा) येथील माजी पंचायत समिती सदस्य  तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव आवरगंड यांची नुकतीच संतोषभाऊ मुरकूटे मित्र मंडळाच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी तर ताडकळस येथील युवानेते गोपाळराव आंबोरे यांची पुर्णा  तालुका संपर्क प्रमुखपदी व दत्तराव गाडवे यांची ताडकळस शहरप्रमुखपदी निवड झाली असुन त्यांच्या निवडीचे माखणी येथे फटाक्यांची अतिषबाजी करुन जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना आवरगंड म्हणाले की तालुक्यात गाव तिथे शाखेची स्थापणा करुन मित्र मंडळाच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकरी , शेतमजुर व सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्या बरोबरच गोदाकाठाच्या विकासाचे प्रश्न संतोषभाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने सोडविणार असल्याचे मनोदय व्यक्त करुन 25 नोव्हेंबर रोजी मित्रमंडळांच्या वतीने आयोजित सर्व धर्मिय संत गौरव सोहळा व संतोषभाऊ मुरकूटे यांच्या अभिष्टचिंतना निमित्त आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील  जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या निवडी बद्दल केरबाजी आवरगंड , रामकिशन काळे , उत्तमराव ढोणे , सदाशीव आप्पा खंदारे , हनुमंत मोहिते , गणपतराव शिंदेे , रमेशराव ठाकुर , मुन्ना राठोड , लक्षमराव वैद्य , नाना कानडखेडकर , अच्युतराव कुऱ्हे , उत्तंमराव कुऱ्हे , कुंडलीक भालेराव , नवनाथा शिंदे , चक्रधर शिराळे , गजानन दुधाटे , रत्नाकर सुर्यवंशी , सोपानकाका बोबडे , रमेश सुर्यवंशी , गोविंद काळे , विशाल भोसले , फिरोज पठाण , छावा संघटनेचे माधव आवरगंड , नामा शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले .
केंद्र व राज्य शासनाच्या मंत्र्यांची फ्लाय ॲश दालनाला भेट

केंद्र व राज्य शासनाच्या मंत्र्यांची फ्लाय ॲश दालनाला भेट

नागपूर/प्रतिनिधी:
 नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे इंडियन रोड कॉग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात देश-विदेशातील नामांकित शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, अभियंते, कंपन्या, उद्योजक, कंत्राटदार व आय.आर.सी. प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेची उपयोगिता वाढविणे, राखेवर आधारित विविध उत्पादनांसाठी पुढाकार घेणे, सिमेंट उद्योग, महामार्ग रस्ता उभारणी, माफक दरात घरबांधणी तसेच पायाभूत सोयी सुविधा कामांमध्ये राखेचा वापर व्हावा याबाबतची नाविन्यपूर्ण माहिती देणारे दालन महाराष्ट्र राज्य राख परिषदेतर्फे ह्या अधिवेशनात उभारण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राख वापरासंबंधीचे धोरण-२०१६ तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करीता महाराष्ट्र राज्य राख परिषदेची स्थापना झाली आहे, हे विशेष.

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, सा.बां मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, सा.बां राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील तसेच केंद्रीय व इतर राज्यांच्या मंत्र्यांनी तसेच मान्यवरांनी सदर दालनाला भेट दिली व  राखेवर आधारित नवनवीन उत्पादनांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम जाधव, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल व  महानिर्मिती-महाजेम्सचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. फ्लाय अॅशपासून निर्माण होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन हे या अधिवेशनाचे विशेष आकर्षण ठरले.

सदर दालनामध्ये महानिर्मिती राख व्यवस्थापन कंपनी मर्यादित (महाजेम्स) मार्फत फ्लाय अॅश आधारित नाविन्यपूर्ण उत्पादने ठेवण्यात आली होती. जसे स्टील फायबर री-इनफोर्सड कॉक्रीट कुंपण भिंत व सांडपाण्याची नाली( Precast Panel & Drains from Steel Fiber  reinforced concrete), फर्निचर शीट, ईपीएस पॅनल(EPS panel), जीओ पॉलिमर कॉक्रीट व कृत्रिम रेतीचे नमुने (artificial sand sample) व ए.ए.सी. लाईट वेट ब्लॉक  (AAC light weight bricks), माती मिश्रित विटा(clay fly ash bricks) इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होता.

Thursday, November 29, 2018

विध्यार्थ्यांना मोफत बस पासेसचे वाटप

विध्यार्थ्यांना मोफत बस पासेसचे वाटप

 राकेश पुनसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
गोंडपिपरी :-

      चालू सत्रात पडलेल्या दुष्काळामूळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.परिणामी गोंडपिपरी तालुक्याचा समावेश राज्यभरातील दुष्काळसदृश्य १८० तालुक्यामध्ये करण्यात आला आहे.यामुळे जमीन महसुलात सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वासलूलीला स्थगिती,कृषी पंपाच्या चालू वीजबिल ३३.५०% सूट,शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्कात माफी यासह एस.टी. महामंडळाच्या बसने आता विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.
         राज्यातील दुष्काळसदृश्य भागाच्या सर्वेअंती १८० तालुक्याची यासाठी निवड करण्यात आली.त्यात गोंडपिपरी तालुक्याचा देखील समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या वने आणि महसूल विभागांतर्गत शासन निर्णय क्रमांक एससीवाय - २०१८/प्र. क्र.८९/म-७,दिनांक २३ ऑक्टोबर २०१८, अन्वये बऱ्याच योजनांसोबतच अनेक बाबतीत शिथिलता लागू करण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणून नुकतेच गोंडपिपरी तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत पासेसचे वाटप करण्यात आले आहे.यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राजुरा विधानसभेचे आमदार संजय धोटे यांचे प्रयत्न राहिले.भाजयुमोचे जिल्हा सचिव,नगरसेवक राकेश पुन,विध्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष गौरव वासेकर, सुनील फुकट यांच्या उपस्थितीत विध्यार्थ्यांना पासेसचे वाटप करण्यात आहे.यानंतर्गत शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक बस पास योजनेचा समावेश आहे.पूर्वी महामंडळाकडून ६६.६७% अनुदान देऊन उर्वरित ३३.३३% रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत होती. मात्र शासनाच्या वरील धोरणानुसार नोव्हेंबर २०१८ पासून तर एप्रिल २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांना १००% अनुदानावर प्रवास करता येणार आहे.सोबतच दुष्काळसदृश्य स्थितीत तालुका असल्याने इतरही बाबीची माहिती अवगत करून घेऊन उपरोक्त योजना आणि सबसिडीचा लाभ घेण्याचे आव्हाहन राकेश पुन यांनी केले आहे.
महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला

महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला

◆९८ जागांकरिता ५४४८२ उमेदवार
◆सुमारे १४ शहरांत २० केंद्रांवर परीक्षा
◆परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर
◆प्रवेशपत्र ई-मेलवर पाठविले
 नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मिती जाहिरात क्र.११(सप्टे)/२०१७ व अधिसूचना ८.८.२०१८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निम्नस्तर लिपिक या या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा निम्नस्तर लिपिक (लेखा) - १ डिसेंबर २०१८  व “निम्नस्तर लिपिक (मासं) -२ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येणार आहे.  परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी तपशीलवार माहिती, महानिर्मितीच्या  www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उपस्थित(हजर) असलेले उमेदवारच केवळ ओंनलाईन परीक्षा देण्यास पात्र आहेत. मात्र, आरोपपत्र दाखल असलेला उमेदवार या परीक्षेसाठी अपात्र आहे.  एकूण ९८ जागांकरिता ५४४८२ उमेदवारांनी अर्ज केला असून राज्यभरातील १४ शहरांत २० केंद्रांवर हि परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर परीक्षा प्रवेशपत्र तसेच त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. देखील पाठविण्यात आला आहे. प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अथवा त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास ०२२-४२०४००५३ /४२०४००५४  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

महानिर्मितीची भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी कळविले आहे.
 ५०० विद्यार्थ्यांना बस पासेसचे वितरण

५०० विद्यार्थ्यांना बस पासेसचे वितरण

उमेश तिवारी/कारंजा (घा):
कारंजा ST कार्यालय द्वारा ५००विद्यार्थ्यांना विनामूल्य पसेसचे वितरण वाहतूक नियंत्रक सिरपुकर व मडावी हस्ते वितरित करण्यात आले.  सिनिअर कॉलेज मधील पार्ट 1 ते फायनलच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच खाजगी शाळेतील व तंत्रनिकेतन    शाळेमधील विद्यार्थ्यांना पासेस देण्यात आल्या मुलींना पासेस शाळेतुन मीळनार असल्याचे सांगण्यात आले. कारंजा हा तालुका दुष्काळ ग्रस्त झाल्यामुळे  बारावी व सिनिअर कॉलेजचे बाहेरगावून विद्यार्थ्यांना ह्या पासेस ST च्या मुख्य कार्यालयातून प्राप्त झाल्यानंतर देण्यात आल्या. त्यासाठी कर्मचारी शालीक मुडे तसेच अंकुश मोगरे यांनी सहकार्य केले.
पुष्पाताई बोके यांचे निधन

पुष्पाताई बोके यांचे निधन

उमेश तिवारी/कारंजा(घा):

कारंजा येथील वॉर्ड न. १० येथील पुष्पाताई बोके वय ६७ वर्ष यांचे काल रात्री ११.३० घरीच निधन झाले. त्या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या. येथील गुरूकुल कॉन्व्हेंटचे पदाधिकारी शरद बोके यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या मागे चार मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. आज दि.२९/११ हायवे लगतच्या स्मशानभूमीत त्यांचा अंतिम सत्कार पार पडला.
दान आणि दया यातील फ़रक ओळखा:मुरलीधरजी महाराज

दान आणि दया यातील फ़रक ओळखा:मुरलीधरजी महाराज

चंंद्रपूर:प्रतिनिधी:

ज्या ठीकाणी दान देण्याची गरज आहे. तेथे न मागता आपण दान केले पाहिजे. जर कोणी गरजवंत आपल्याकडे मागण्यासाठी आला आपण त्याला मदत केली तर ते दान नाही,तो दया भाव आहे. दया आणि दान मधील फ़रक ओळखणं जरुरी आहे, असे प्रतिपादन पूज्य मुरलीधरजी महाराज यांनी केले. चांदा क्लब ग्राउंड येथे सूरू असलेल्या नऊ दिवसीय रामकथा महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ते बोलत होते.

मुरलीधरजी महाराज पुढे म्हणाले, खोटं बोलून, कपट करून कमवलेले धन कधी सुख देऊ शकत नाही. कलयुगात सत्य,तप आणि वैराग्य दुर्मिळच झाले आहे, पुण्य कमविण्यासाठी दान केले पाहिजे. दान दिल्यावर त्याची प्रशंसा ऐकणं ही बरोबर नाही.
पूज्य मुरलीधरजी महाराजच्या हस्ते डॉ. सुशील मुंदडा, मोहन महाकाळे, राजगोपाल तोष्णीवाल, अनुप गांधी, पियुष माहेश्वरी, महावीर मंत्री  राजकुमार अग्रवाल, शिव जाजू, शितल जैन, हनुमान अग्रवाल यांचा सम्मान करण्यात आला.

 आज राम- जानकी विवाह प्रसंग

राम कथेच्या सहाव्या दिवशी राम जानकी विवाहाचा प्रसंग उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा  केला. श्रीराम कथा आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण तिवारी, ओम सारडा, शिव सारडा, रोडमल गेहलोत, सुरेश अग्रवाल, ब्रजमोहन मुंदडा, रामकिशोर सारडा, रमेश मुंदडा ,विनोद उपाध्याय, कुंजबिहारी परमार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. 

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना आवाहन

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूरातील सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहयोगाने दिनांक 22 आणि 23 डिसेंबर 2018 ला राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन चंद्रपूर येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार आणि चित्रपट निर्माता- दिग्दर्शक रामदास फुटाणे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील 150 च्या आसपास साहित्यिक सहभागी होणार असून उदघाटनसह तीन विषयांवर चर्चासत्र, निमंत्रितांचे दोन कविसंमेलन, कथाकथन, रामदास फुटाणे यांची प्रकट मुलाखत, पुस्तक प्रकाशन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह अन्य कार्यक्रम होतील. या संमेलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची प्रसिद्धी करता यावी, त्यांच्या पुस्तकांची माहिती रसिकांपर्यंत पोहोचवतात यावी यासाठी या संमेलनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन आणि विक्री संमेलनस्थळी करण्यात येणार आहे. तरी ज्या साहित्यिकांना आपल्या पुस्तकाच्या प्रति संमेलनस्थळी ठेवायच्या असतील त्यांनी अधिक माहितीकरिता दिनांक 10 डिसेंम्बर 2018 पर्यंत संस्थेचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष इरफान शेख यांच्याशी 9665413821  या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

अनुप सेठ 
आयुर्विमा ही एक अत्यावश्यक बाब असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विम्याच्या एकूण हप्त्यांचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ पावणेतीन टक्के असल्याचे चालू वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींनी विमा घेतलेला असतो त्यातील बहुतांश व्यक्ती या अंडरइन्श्युअर्ड म्हणजे सोप्या भाषेत, अपुऱ्या रकमेचा आयुर्विमा घेतलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी आयुर्विमा घेण्याची प्रक्रिया ही काहीशी प्रदीर्घ व वेळखाऊ होती. मात्र आता अनेक कंपन्यांचे पर्याय असल्याने तसेच, ऑनलाइन विम्याची सुविधा असल्याने आयुर्विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. तरीही संपूर्ण कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणाऱ्या आयुर्विम्याला आजही प्राधान्य दिले जात नाही. एवढेच नव्हे तर आयुर्विम्याविषयी बहुतांश मंडळी गैरसमजूती बाळगतात. मी अतिशय निरोगी आहे, माझ्याकडे बरीच संपत्ती आहे, मला बिलकूल वेळ नाही आदी असंख्य कारणे आयुर्विमा टाळण्यासाठी पुढे केली जातात. ही मानसिकता अतिशय घातक असून त्यात बदल होणे गरजेचे आहे. आयुर्विम्याविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुतींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 

Image result for विमा
केवळ करबचतीचे साधन 

आयुर्विमा हे केवळ करबचतीचे साधन आहे ही फार चुकीची समजूत सर्वत्र दिसून येते. आयुर्विमा खरेदी केल्याने तुम्हाला करबचतीचे लाभ मिळतात यात काही शंका नाही. परंतु हे काही विमा खरेदीचे एकमेव कारण असू शकत नाही. योग्य सल्ल्यानुसार आयुर्विमा घेतल्यास ते केवळ तुमच्या कुटुंबाचे सुरक्षाकवच ठरत नाही, तर अर्थसंकलनाचे साधनही होऊ शकते. गंभीर आजार, अपघात आदी अप्रिय प्रसंगी तुमच्या बचतीला धक्का लागणार नाही याची काळजी आयुर्विमा पॉलिसी घेते. त्यामुळे याकडे केवळ करबचतीच्या दृष्टीने पाहू नये. 

गरज केवळ कर्त्या व्यक्तीला 

आयुर्विम्याची गरज ही केवळ घरातील कर्त्या व्यक्तीला असते हा समजही चुकीचा आहे. घरातील प्रमुख कमावत्या व्यक्तीवर पूर्ण घर अवलंबून असते व त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुर्विमा असणे हे गरजेचेच असते. मात्र गृहिणीदेखील तितकीच महत्त्वाची असते. गृहिणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते. या जबाबदाऱ्यांचे मूल्य किती याचा विचार आता सरकारी स्तरावरही होऊ लागला आहे. त्यामुळे गृहिणीला आयुर्विम्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढणे साफ चुकीचे ठरते. उलटपक्षी, घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा विमा उतरवून त्याच्या सुरक्षाकवचाची खातरजमा करून घेतली पाहिजे. तुमच्या गैरहजेरीत जोडीदारावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. अशा स्थितीत त्यांच्याकरिता एखादा टर्म प्लॅन घेणे हा योग्य निर्णय ठरू शकतो. 

आयुर्विमा महाग आहे 

आयुर्विम्यावर फार मोठी रक्कम खर्च करावी लागते, असे काहींना वाटते. मात्र त्यात तथ्य नाही. योग्य संशोधन आणि योग्य सल्ल्यानुसार, तुम्ही वर्षाला पाच हजार रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांचे विमाकवच मिळवू शकता. आयुर्विमा कमी वयात खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्सचा खर्च आणखी कमी होईल. तरुण ग्राहक हा अधिक सुदृढ असतो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय व जुजबी तपासण्यांच्या आधारे या व्यक्तीला कमी शुल्कात मोठे विमाकवच मिळू शकते. 

प्रकृतीविषयक समस्यांमुळे अपात्रता 

प्रकृतीच्या समस्या असल्यास आयुर्विमा घेता येत नाही असे नाही. परंतु, त्यामुळे तुम्ही भरत असलेल्या पॉलिसी प्रीमियमवर परिणाम होतो. तरीही विमाकवच हे मिळतेच. प्लानमध्ये आधीच नमूद असलेल्या काही गंभीर आजाराचे निदान झाल्यास विमाधारकाला ठरावीक रक्कम मिळते हे नक्की. आपण सर्वजण ज्या धकाधकीचे जीवन जगत आहोत ते पाहता अतिरिक्त खर्च करून आयुर्विमा खरेदी केल्यास ते स्वत:सह कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी चांगलेच ठरते. 

कर्ज नसल्याने विम्याची गरज नाही 

पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज असल्यास त्याने आयुर्विमा घेणे अत्यावश्यकच आहे. परंतु एखाद्या कर्त्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज वा अन्य कोणतेही कर्ज नसले तरी त्यानेही आयुर्विमा घेणे अत्यावश्यक ठरते. जीवनातील अनिश्चिततेचा विचार करता आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विम्याला पर्याय नाही. विमाधारकाच्या बाबतीत दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास विम्याच्या आधारे त्या कुटुंबाचे राहणीमान पूर्वीप्रमाणेच चांगले राहू शकते.
(सदर माहिती महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातून 
घेण्यात आली आहे)
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

 वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार

            मुंबई/प्रातिनिधी:
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


            अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने        13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात‍ आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वा‍घिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.

त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.

            वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर,  प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला
  गळफास घेवुन आत्महत्या

गळफास घेवुन आत्महत्या

उमेश तिवारी/ कारंजा(घा)  :
एकार्जुन येथील रहवासी हेमराज मारोतराव देशमुख वय ४० वर्ष या व्यक्तिने आज दि.२८/११/२०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमरास त्याच्याच स्वतःच्याच घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
      पोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
         मृतकाचे मागे पत्नी,मुलगा आणि वडील असा परिवार आहे. आत्महत्येचे  अद्याप कारण समजू शकले नाही. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.
मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज

मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

हातातील अंगठीच्या खड्यावर अवलंबून न राहता आपल्या हाताने केलेल्या कर्माच्या भरोवश्यावर मनुष्य आपले  भविष्य बदलू शकते.मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मावर अवलंबुन आहे. पण काही लोक त्यास रंगीत खड्यात शोधतात.राम कथेच्या पाचव्या दिवसाच्या प्रवचन पुष्प गुंफतांना पूज्य मुरलीधरजी महाराजांनी सांगितले.
रामकथेच्या पाचव्या दिवशी सत्यनारायण तिवारी परीवार तर्फे श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पुजन कऱण्यात आले
श्री मुरलीधर जी महाराज पुढे म्हणाले की, या जगात भजन करणे जरुरी आहे,भजना द्वारे वैराग्य मिळवता येते.या प्रसंगी CA दामोदर सारडा,मधुसूदन रुंगठा, रमेश मुंदडा, विनोद उपाध्याय, सुरेश शर्मा,जुगलकिशोर राठी, काजु जोशी,गोपिकीशन पोद्दार, नितीन सोमाणी, सुभाष जैन,इंदर बियाणी, यांचा महाराजांनी सम्मान केला.
रामकथेच्या यशस्वीतेसाठी वेगवेगळ्या समितीचे गठन करण्यात आले आहे,अशी माहिती सुरेश राठी यांनीं दिली.

आज सामुहिक सुंदर कांड पठण
चांदा क्लब ग्राउंड वर स्थापीत अयोध्या धाम येथे गुरुवारी रात्री 9 वाजता सामुहिक सुंदर कांड पठण चे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम चरित्र मानस प्रेमी तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, November 28, 2018

चंद्रपूर मनपात सी.एम चषक बैठक संपन्न

चंद्रपूर मनपात सी.एम चषक बैठक संपन्न

       चंद्रपूर/प्रतिनिधी:

दिनांक २७/११/२०१८ रोजी मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री चषक बाबत बैठक घेण्यात आली. 
                           देशातल्या सर्वात मोठ्या खेळ महोत्सव सी.एम. चषकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. त्यानुसार आपल्या चंद्रपूर शहरात हि या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.  खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुलां-मुलीं करीता  एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्याचे  उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडू आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणार.  तरी सर्व युवक युवतींना या स्पर्धेत  सहभागी व्हावे व आपली नोंद करावी. असे आवाहन महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी केले. या करिता ऑनलाईन वेबसाईट https://www.cmchasak.com सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
                            या प्रसंगी उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. जयश्री जुमडे, उपसभापती सौ. शीतल गुरनुले, सभापती झोन क्र. १ सौ. माया उईके, सौ. शिला चौहान, सौ. वंदना तिखे, सौ. वनिता डुकरे, सौ. संगीत खांडेकर नगरसेवक श्री. सोपान वायकर, श्री. रवी आसवानी, ऍड. श्री राहुल घोटेकर तसेच सी.एम. वाररुम चे श्री. दिनेश रिंगणे उपस्थित होते.
युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा

युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा

                    वाडी नगर परीषदेवर मटका फोड आंदोलन

भीषण पाणीटंचाईच्या  विरोधात  नागरिकांचा आक्रोश
वाडी / अरूण कराळे :

येथील डॉ .आंबेडकर नगर मध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात  टंचाई निर्माण झाली असून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेकडो महीला व पुरुष हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात बुधवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता वाडी नगर परिषद वर हल्लाबोल केला . या आंदोलनाला पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया व भारीप बहुजन महासंघ यांनी  पाठींबा दिला होता .वाडी नगरपरिषद क्षेत्रातील डॉ .आंबेडकर नगर मध्ये  सामान्य व गोरगरीब कुटूंब राहत असून बहुतेकांचा व्यवसाय,मजुरी खाजगी काम करणे  आहे .१५ दिवसांपासून या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आंदोलना दरम्यान नागरीकांनी लाठी काठी खायेंगे , पाणी लेके जायेंगे  अशा प्रकारचे नारे देऊन परिसर दणाणून सोडला . काही  महीला मटका घेऊन आल्या होत्या त्यांनी  प्रशासनाविरोधात मटका फोडून निषेध केला . अनेक दिवसांपासून येथील नागरीकांच्या घरी  पाणी येथे बंद झाले आहे कामधंदे सोडून पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाडी  नगर परिषद  व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या विरोधात असंतोष पसरलेला दिसून आला . या अगोदर  नगरपरिषद प्रशासनाला पाण्याच्या टंचाई बद्दल माहीती देऊनही कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे आंदोलनकर्त्यचे म्हणणे होते . मुख्याध्याधिकारी राजेश भगत यांना हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस,पिरीपाचे तालुका अध्यक्ष  कंटीराम तागडे भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा सल्लागार राजेश जंगले,कांग्रेसचे निर्मला नागपुरकर,गौतम तिरपुडे,किशोर नागपुरकर,भीमराव कांबले,अशोक गडलिंगे,वंदना कांबले,किरण पवार,सिमा कांबले,गीता उके,प्यारेलाल पवार आदींनी निवेदन देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी दिली .आदोंलनादरम्यान वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला . याविषयी मुख्याधिकारी राजेश भगत यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की वाडीतील पाणी टंचाईच्या समस्येवर शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्या सोबत  बैठक घेण्यात येईल व पाण्याच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .
नागौर जिल्हयाची जबाबदारी डॉ.वारजुरकरांकडे

नागौर जिल्हयाची जबाबदारी डॉ.वारजुरकरांकडे

चिमूर/रोहित रामटेके:

 राजस्थान विधानसभा निवडणुकी मध्ये काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी सुरू असुन अखील भारतीय कॉंग्रेस कमेटीने चिमूर निर्वाचण क्षेत्राचे माजी आमदार , माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंड़ळ तथा प्रदेश काँग्रेस कार्यकारणी सदस्य डॉ . अविनाश वारजुरकर यांच्या संघटन व नेतृत्व कौशल्यावर विश्वास ठेवुन त्यांना नागौर जिल्हाचे निरीक्षक म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे .
       अखिल भारतीय कांग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल गांधी तथा राजस्थान चे प्रभारी अविनाश पांडे यांनी राजस्थान विधानसभेवर काँगेसचा झेंडा रोवण्याची जोरदार तयारी केली असुन याकरीता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा कामाला लावले आहे . राजस्थान मधील नागोर जिल्हाची निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी माजी आमदार डॉ अविनाश वारजुर यांचेवर सोपविली असुन त्यांच्या मदती करीता चिमुर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणीस डॉ .विजय गावंडे यांची सह प्रभारी म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे .यांच्या नियुक्तीबद्दल चिमुर विधानसभा काँग्रेस कार्यकारणी तर्फे आंनद व्यक्त करीत त्यांना दिलेल्या जबाबदारीमध्ये सुयश मिळण्या करीता शुभेच्छा देण्यात आल्या .
चंद्रपूर वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ पुरस्कारासाठी निवड

चंद्रपूर वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ पुरस्कारासाठी निवड

नागपूर/प्रतिनिधी:

महानिर्मितीच्या २९०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची जल संवर्धन व पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्कारासाठी ग्रीन मॅपल फाउंडेशनने निवड केली आहे.

 पर्यावरण संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याचे काम ग्रीन मॅपल फाउंडेशन करीत असते. २ डिसेम्बर २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही चंद्रपुरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हि प्राथमिकता ठेवली तर दुसरीकडे  वीज उत्पादन देखील सुरळीत सुरु ठेवले. अतिशय नियोजनबद्ध असे सर्वोत्तम “जल संवर्धन” केल्याने चंद्रपूर वीज केंद्राची “जल संवर्धन” विजेता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सोबतच चंद्रपूर वीज केंद्रात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु असते, ज्यामध्ये  पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय परिसंवाद, कार्यशाळा, जनजागृती, वृक्षारोपण मोहीम तसेच विविध उपक्रमांचा समावेश असतो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन ग्रीन मॅपल फाउंडेशनने चंद्रपूर  वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ या  “पर्यावरण व्यवस्थापन” साध्य करणाऱ्या पुरस्कारासाठी देखील निवड केली आहे. 

विशेष म्हणजे, यावर्षी, पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्याबद्दल चंद्रपूर  महाऔष्णिक विद्युत केंद्राला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फोर स्टार रेटिंग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

वीज उत्पादन करताना हवेतील प्रदूषण कमी ठेवणे, धूलीकण वातावरणात पसरू नयेत याकरिता आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा शून्य निसरा ठेवणे, राखेची उपयोगिता वाढविणे, वातावरणातील हवेच्या दर्जाचे मोजमाप करणे इत्यादीबाबींवर वीज केंद्र प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Tuesday, November 27, 2018

प्रसिद्धी ही प्रतिष्ठा व अहंकार वाढविते:मुरलीधर महाराज

प्रसिद्धी ही प्रतिष्ठा व अहंकार वाढविते:मुरलीधर महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:
पद, प्रसिद्धी सोबत आलेली प्रतिष्ठा व्यक्तीला अहंकारी बनवते, अहंकार पासून दूर राहून मिळवलेली प्रतिष्ठा आयुष्यात शेवटच्या क्षणा पर्यन्त टिकते, असे प्रतिपादन पूज्य मुरलीधर जी महाराज यांनी केले. ते पुढे म्हणाले, आयुष्यात संपत्तीचे संग्रह जरूर करावें पण त्या संपत्तीचा उपयोग सत्कर्मासाठी करावा. सोबतच पुण्य संग्रह करीत विश्वास पूर्ण जीवन जगावे.

क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या राम कथा महोत्सव च्या चौथ्या दिवशी प्रवचनात ते बोलत होते.
आज चे दैनिक यजमान विनोद उपाध्याय परिवाराच्या उपस्थितित मानस ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

जिप अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, ललित कासट,प्रा जुगल सोमाणी ,सुरेश गर्ग,हनुमान प्रसाद अग्रवाल, वेद प्रकाश अग्रवाल यांना पूज्य मुरलीधर महाराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

पुणे/प्रतिनिधी:
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.29) बंद राहणार आहे. याशिवाय शुक्रवारीही (30 नोव्हेंबरला) बहुतांश भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या नवीन पाचशे एमएलडी प्लान्टसाठी नवीन वीज पुरवठ्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.

   कोणत्या परिसरात पाणीपुरवठा राहणार बंद 
शहरातील सर्व पेठा, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषा, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रुंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता, इ. ठिकाणी पाणी बंद राहणार आहे.
सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घा)


 सततच्या नापिकीमुळे व कर्ज बजारीपणामुळे सावळी खुर्द येथील विश्वास चंद्रभानजी कडवे वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२७/११/१८ रोजी दुपारी १:३० वा त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 
      पोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 
         मृतकाचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे. त्यांच्याकडे ३ एकर शेती आहे. कर्ज ७०हजार आहे असे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला

प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला

चिमुर/प्रतिनिधी : - 
मुलीच्या वडीलाने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला संपविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रियकराने मुलीच्या वडिलांना लग्नाची मागणी केली,मात्र मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्या
ने प्रियकराने धारधार चाकूने मुलीवर हल्ला केला.चेतन सुरेश गजभे  वय 22 वर्षे असे या हल्ला करणाऱ्या प्रेमीयुवकाचे नाव आहे,

नेहरू ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण घेत असलेली ती तरुणी (वय १८वर्ष) हिच्यावर मागील चार वर्षांपासून प्रेम होते .मात्र लग्नाची मागणी मान्य न होताच मनात राग धरून बसलेल्या युवकाने मुलीवर कॉलेजमधून ये असतांना हल्ला केला,
व गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

आरोपीने घटना घडल्यानंतर हताश होऊन स्वतःचे जिवन संपविण्याच्या नादात विष प्राशन केले.  या नंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले .तर त्या जखमी युवतीची प्रकृती गंभीर असल्याने  तिला नागपूर येथे रेफर करण्यात आले.या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद मडामे करीत आहेत
हिरापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

हिरापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

सरपंचाचा मनमानी कारभार
आवाळपूर /प्रतिनिधी:- 

हिरापूर गाव आय एस ओ मानांकित दर्जेदार शाळा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकामुळे पंचक्रोशीत नावाजला गेल मात्र ग्रामपंचतीचा भोंगळ व नियोजन शून्य कामाचा अभावामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीचा व सरपंच भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. त्यातच भर पडत आहे. अनके महिन्यापासून रोजंदारी वर काम करणाऱ्या कर्मचारी याना घरचा रस्ता दाखवून आपल्या जवळच्या माणसाला कर्मचारी म्हणून ठेवल्या गेले. या पूर्वी काम करीत असलेला कर्मचाऱ्यांवर आता  उपासमारीची वेळ आली आहे.

हिरापूर येथे मागील अनके वर्षापासून रमेश महादेव दासारकर सदर व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्याची प्रकृती वारंवार खराब होत असल्याने रोजंदारीवर सतीश वामन बोढे वय 26 वर्षे काम करीत होते.त्यातच रमेश याची प्रकृति खालावल्याने त्याचा मृत्यु झाला. तेंव्हा देखील सतीश हा रोजनदरी वर ग्रामपंचायत ला कार्यरत होता .काही महिन्या नंतर त्यांनी मला कायमस्वरूपी करा असे अर्ज केला. मात्र सरपंचाने आपल्या दडपशाही वृत्तीने या नंतर तू इथे कामावर यायचं नाही ग्राम पंचायत पेसा कायदा अंतर्गत येत असल्याने एस टी करीत राखीव आहे असे म्हणून त्यांनी काढून टाकले.

सरपंचाच्या अश्या दडपशाही वृत्तीने सतीश नि दिलेली सेवा ही फिकी पडली आणि त्याने केलीली सरड कामे सरपंचाला खडसावत असल्याने त्या कर्मचाऱ्याला  कामावरून कमी करून बेरोजगारीचा दगड सरपंचाने फेकून मारला आहे.

प्रामाणिकपणे ग्राम पंचायत भवनात काम करून लोकांना सेवा देणारा सतीश बोढे च्या हाताला काम नसल्याने तो बेरोजगारी ग्रस्त झाला आहे .त्या कर्मचावर मात्र आता उपासमारीची वेळ आली असून एवढे दिवस काम करून त्याचा पदरी निराशा पडली आहे.

 ( सरपंच यांनी माझा कोणताही विचार न करता सरळ मला काढून दिले त्याचा या मनमानी कारभारा  मुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे..मला योग्य ते न्याय देऊन पूर्ववत घ्यावे...सतीश बोढे, हिरापूर
अखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले

अखेर पप्पू देशमुख यांनी अंबुजाचे डिस्पॅच रोखले

<strong>

चंद्रपूर- अंबुजा गेटसमोर 27 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटेच्या अंधारात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांनी अचानक ठिय्या मांडला.या आंदोलनामुळे एकच खळबळ उडालेली आहे.विशेष म्हणजे गनिमी काव्याने आंदोलन सुरू करण्यात आले.आंदोलनाची कानोकान खबर सुध्दा पोलिसांना लागली नाही.आज 27 नोव्हेंबर पासून प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्याची लेखी सुचना देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना दिलेली होती.साखळी उपोषणेकरिता गडचांदूर च्या पेट्रोल पंप चौकात काल 26 नोव्हेंबर रोजी मंडप सुध्दा टाकण्यात आलेला होता.ही सर्व तयारी पाहून पोलिस विभागाचा गोंधळ झाला.आंदोलनकर्त्यांनी मात्र ठरल्याप्रमाणे सर्व प्रकल्पग्रस्तांना पहाटेच्या अंधारात एका ठिकाणी जमा केले.पहाटे पाच वाजता अचानक धावा बोलून त्यांनी कंपनीचे गेट बंद करून ठिय्या मांडला.सकाळी 6.30च्या सुमारास या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जमा झाला. 

मागील दहा महिन्यापासून चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात अंबुजा सिमेंट कंपनीमुळे प्रकल्प बाधित झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांचे तसेच पगडी गुड्डम धरणामुळे प्रकल्प बाधित झालेले आदिवासी व अंबुजा कंपनी मध्ये काम करणाऱ्या प्रकल्पबाधित कामगारांचे कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू होते.अंबुजाच्या प्रकल्पबाधित बेरोजगारांनी तब्बल 60 दिवस चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. देशमुख यांनी या प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी साठ किलोमीटरची पदयात्रा सुध्दा काढली होती. त्यासोबतच त्यांनी 2018 रोजी अंबुजाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीवर ताबा घेऊन आंदोलन सुद्धा केले.या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यात कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.योग्य कारवाई झाली नाही व प्रकल्पबाधित लोकांना न्याय मिळाला नाही तर अंबुजाचे डिस्पॅच रोखणार असा इशारा देशमुख यांनी दिला होता.त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देशमुख यांनी केली.आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या अंधारात प्रकल्पग्रस्तांसह पप्पू देशमुख यांनी अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटवर गेटसमोर ठिय्या मांडला.कंपनीमध्ये सकाळच्या शिफ्टला जाणारे कामगार व सिमेंटचे ट्रक व रेल्वे रोखण्यात आली. पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांना या आंदोलनाची कानोकान खबर लागली नाही. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाला 27 नोव्हेंबर रोजी गडचांदूर येथे साखळी उपोषण सुरू करणार असे पत्र देऊन इशारा दिला होता. परंतु त्यांनी गडचांदूरच्या पेट्रोल पंप समोर 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे आदल्या दिवशी मंडप वगैरे टाकल्यामुळे पोलिस विभागाची दिशाभूल झाली.जोपर्यंत अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरणामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील सदस्याला तसेच ठेकेदारी मध्ये काम करणाऱ्या प्रकल्पबाधितांना वेज बोर्ड मध्ये परमनन्ट नोकरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे भव्य संविधान दौड

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे भव्य संविधान दौड

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे भव्य संविधान दौड  संपन्न
     भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना  आपल्या देशाला बहाल केली. या दिवसाची आठवण म्हणून भारतीय संविधान दिन व आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिनाच्या निमित्ताने संविधान दौडचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके यांच्या संकल्पनेतून संपन्न झाली.
           संविधान दौड, मातोश्री समोरील  संविधान चौक दे.गो. तूकूम पासून ते गांधी चौक ते संविधान चौक या मार्गाने आयोजित करण्यात आलेली होती. संविधान दौड दोन गटात असून अ गट १० ते १५, ब १६ ते २० गटामध्ये होती. सकाळी ६ वाजता मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या संविधान दौडला सुरुवात झाली. या संविधान दौड मध्ये १२६० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. अ गटतून मुलामध्ये प्रथम क्रमांक रोहन दुर्गेश भुसेवार, द्वितीय क्रमांक प्रणित दिवाकर लांडे, तृतीय क्रमांक प्रतीक सतीश गर्गेलवार, चतुर्थ क्रमांक दिलीप हिरालाल कश्यप अ गटातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक कुमारी नंदिनी संतोष पंडित, द्वितीय क्रमांक कुमारी सलोनी दिवाकर बारसागडे, तृतीय क्रमांक कुमारी आचल आत्माराम वाघमारे, चतुर्थ क्रमांक कुमारी तनुष्री संजय जुंनारे, ब गटातून मुले प्रथम क्रमांक शिवाजी नंदकुमार गोस्वामी, द्वितीय क्रमांक अजय वामन काटलाम, तृतीय क्रमांक रितेश दिनेश विघ्ने, चतुर्थ क्रमांक पवन वसंत डवरे, ब गटातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक कुमारी किरण दादाजी बोरसरे द्वितीय क्रमांक कुमारी प्रियंका सुभाष तायवाडे, तृतीय क्रमांक कुमारी अनिका धनराज सोनवणे, चतुर्थ क्रमांक कुमारी धम्मज्योती रवींद्र रायपुरे, या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला.
   चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज जर आपण बारकाईने विचार केला तर आज देश अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहे देशाची परिस्थिती बिघडत आहे जणू काही देशात अघोषित आणीबाणी जाहीर झालेली आहे  या सर्वांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे  त्यामुळे या संविधानाचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे .
      या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण यासाठी एड. रवींद्र भाऊ खनके ,एड. ह.ना. जांभळे, प्रा. अनिल शिंदे, शिरीष तपासे अध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल, प्राध्यापिका जयश्रीताई खनके, प्रा. योगेश दुधपचारे, प्रदीप वाढई, संजय बिजवे, क्रीडा विभागाचे श्री काटकर सर, श्री संजय जुबडे, तसेच काँग्रेस सेवादलातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. सविधान दौडसाठी पोलीस विभाग ,वाहतूक विभाग ,आरोग्य विभाग, कुस्तीगीर संघटना, सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकार ,यांचे  सहकार्य लाभले.
संविधान दिनानिमित्त संविधान आवृत्तीची भेट

संविधान दिनानिमित्त संविधान आवृत्तीची भेट

पवनी/मनोज चीचघरे:

भारतीय संविधान देशाला अर्पण करून भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याला 69 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा 69 व्या संविधान दिनानिमित्त पवनी येथे साजरा करण्यात आला.
पवनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर ठेवलेल्याा भारतीय संविधानाच्या मराठी व इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे पूजन करून संविधानाला अभिवादन करण्यात आले.
त्याच प्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार घालून मान वंदना देण्यात आली.
तसेच माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद करून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.

यावेळी न.प.उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, विलास भाऊ काटेखाये,विकास भाऊ राऊत, बंडू हटवार, डाॅ. विक्रम राखडे, हंसराज रामटेके, अॅड महेंद्र गोस्वामी, जयपाल नंदागवळी, राजकुमार लोखंडे, न.प.सदस्या शोभना गौरशेट्टीवार, नंदागवळी, सुरेखा जनबंधू, माजी उपाध्यक्ष दिनेश गजभिये,डाॅ. महादेवदास गोस्वामी, योगेश बावनकर, गोकुळ शेंडे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मल्हार व्यायाम शाळेत संविधान दिन साजरा

मल्हार व्यायाम शाळेत संविधान दिन साजरा

धुळे प्रतिनिधी/जैताणे:

भारतीय संविधान देशाला अर्पण करून भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याला 69 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा 69 व्या संविधान दिनानिमित्त मल्हार  व्यायाम शाळा जैताणे येथे य साजरा करण्यात आला.
जैताणे  येथील मल्हार व्यायाम शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान च्या प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले .
त्या प्रसंगी प्रा रविंद्र सूर्यवंशी व श्री अशोक मुजगे यांनी महत्व पटवून देत संविधान वर टिकून असलेल्या लोकशाही ची माहिती दिल भारतीय संविधानाचे महत्व विषद करून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.
यावेळी  पदाधिकारी उपस्थित होते.जैताणे शहर तालुका साक्री येथे संविधान दिवस  साजरा करताना  भाजप भ.जा.वि.ज. आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ शेलार,जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच श्री अशोक मुजगे ,संविधान वाचन करताना प्रा.रविंद्र सुर्यवंशी, देविदास महाराज, सागर बोरसे,आनंदा सोंजे, डॉ. हरीभाऊ ठाकरे,किरण भदाणे, भिकन वाघ, राकेश भदाणे, समाधान पगारे, विकी पेंढारे, आदी उपस्थित होते.
आठवले समाजकार्य महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

आठवले समाजकार्य महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

चिमूर/रोहित रामटेके:

देशभरामध्ये ६९  व्या संविधान दिन मोठ्या जोरात ठीक ठिकाणी साजरा करण्यात आला. तसाच कार्यक्रम चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा महामार्गावर येत असलेले आठवले समाजकार्य महाविद्यालयात सुद्धा ६९ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ शुभांगी वडस्कर, ग्रंथपाल प्रा.सुरेश हुमने यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

      कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाँ. प्राचार्य शुभांगी वडस्कर,प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे अधीक्षक सुभाष शेषकार,लेखापाल राजाभाऊ खडसंगे, ग्रंथपाल प्रा. सुरेश हुमने, वरीष्ट लिपिक मा.अनिल मेश्राम,जोत्सना सिंगनजुडे, रंगनाथ बागडे, मोहन गुरुले, दयाराम गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
     तसेच मान्यवरांनी घराघरात संविधान पोहोचले पाहिजे व त्याचे कारण वाचन व अनुकरण झाले पाहिजे अशी उपस्थित समाजकार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा घेतली व कार्यक्रमाची सांगता झाली.
संविधान सप्ताह निमित्ताने समता दूतांंकडुन संविधान प्रतीचे वाटप

संविधान सप्ताह निमित्ताने समता दूतांंकडुन संविधान प्रतीचे वाटप

उमेश तिवारी/कारंजा(घा)

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्य संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या समतादूत पथदर्शी प्रकल्पा मार्फत संपूर्ण राज्यात संविधान सप्ताह 26 नोहे. ते 2 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने कारंजा तालुक्यातील समता दूत सिद्धार्थ सोमकुवर यांच्या कडून कारंजा , कारंजा पोलिस स्टेशन येथील psi रामदास केंद्रे , कारंजा पंचयात समितीचे गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी व नगरपंचायत च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत व नगर उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांना भारतीय संविधानाच्या प्रतीचे व उद्देशिकीच्या प्रतीचे वाटप करण्यात आले
तालुक्यात बर्टी च्या या समतादूता कडून सामाजिक ऐक्य बंधुभाव राष्टीय एकात्मता संविधान जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन वैधानिक दृष्टीकोण व संतांचे व महापुरुषांचे समतेचे विचार शाळा ,महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी पोहचविले जात आहे
26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण



उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)
 कारंजा (घा ) -महाराष्ट्राची राजधानी मुंबई  शहरावर आज पासून 10 वर्षांपूर्वी घडलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील वीर शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  . स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेप्रति आपले कर्तव्य बजावत जवानांनी आपले प्राण गमावले होते. संपूर्ण देश 26/11 चा हल्ला विसरू शकणार नाही व येणाऱ्या दशकात विसर पडणार नाही ,असा घाव संपूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात पडला आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
 कारंजा शहरातील मित्र परिवाराच्या वतीने नगरपंचायत कॉम्प्लेक्स परिसरात शहिदांना श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला 26/11 च्या हल्ल्यातील घडलेल्या घटनांची रीतसर माहिती देत जवानांच्या स्मृती उजाळा देण्यात आला. त्यानंतर उपस्तीत मान्यवर , व्यापारी , नागरिक व विद्याथ्यानच्या वतीने कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . मौन श्रद्धांजली अर्पण करून मा .सुभाष अंधारे सर ,पोलीस उप-निरीक्षक मा. केंद्रे साहेब ,मा. विलास वानखडे सर व मा .प्रेम महिल्ले सर यांनी हल्ल्यातील घटनेची माहिती देत शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली कार्येक्रमाला कारंजा शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते कार्येक्रमाचे सूत्रसंचालन मा पवन ठाकरे सर यांनी केले तर कार्येक्रमच्या यशस्वीते करिता  स्थानिक मित्रपरिवारने सहकार्य केले .
निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप

निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप




   कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

     लोणखेडे - जवा दुष्काळ घिरट्या घाली, तवा बळीराजाला कुणीना वाली असच चित्र सध्या दिसते . सततचा दुष्काळ त्यातही यावर्षीचा महाभयंकर दुष्काळ यातुनही मार्ग काढीत कसाबसा पिकविलेला कांदा आज जेव्हा कवडीमोल भावाने विकला जातो, रस्त्यावर फेकला जातो , तेव्हा शेतकरी व त्याच्या कुटूंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. दिनवानी होऊन शेतकरी राजा म्हणतो मी कसला राजा? राजा तर कुंभकर्णी झोप घेतोय..आणि शेतकरी राजाला कायमच सरणावर झोपवायची सोय करतोय.
 
      लोणखेडे गावातील शेतकरी काल चांदवड बाजारपेठेत कांदा विक्रीस घेऊन गेले कांदा चांगल्या प्रतीचा असूनही त्याला कवडीमोल दर मिळाला . सर्व स्वप्नं दुःखाश्रू बनून वाहू लागले  शेतकरी जाईल तरी कुठं ..? झोपलेल्यास उठविता येत परंतु कुंभकर्णी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागवण आता अशक्यच वाटू लागले .

      कांदा उत्पादक प्रचंड अडचणीत सापडलेला असताना त्याच्या दुःखावर फुंकर मारणार कुणीही नाही, ठोस निर्णय घेतला जात नाही..कृषीप्रधान देशात कृषकाचीच अशी दुरावस्था ही मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल.


मी ३३. ४० किलो चांगल्या प्रतीचा कांदा विकला फक्त ३९०/-रु. क्विंटल दराने मला हमाली काढून रुपये मिळाले  १२६७४/ त्यातून गाडीभाडे ४०००, कांदे काढणे मजूरी ३५००, लागवडीसाठी ३०००, खत, नांगरणी, निंदणी, फवारणी इ. साठी ९५००.  ४ महिने मी व माझे कुटूंबीय राबले ती मजुरी तर हिशेबातच नाही..आलेल्या पैशातून नफा व मजूरी तर सोडा पण टाकलेल्या भांडवलाचा निम्मे खर्चही निघाला नाही. खरंच आता या कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही. म्हणून खूपच वाईट वाटत.
      गेल्या ३/४ वर्षापासून सतत दुष्काळ  पडतो.  शेती मालाचे उत्पादन निम्मे झाले , तर खर्च चौपट झाला  भाव मात्र घटतोय पण वाढत नाही, पाणी नाही, कसेबसे पिकल तर विकल जात नाही.. मग शेतकरी जगेल तरी कसा ?  त्याला सर्व पर्याय संपतात म्हणून हताशपणे  चुकीचे मार्ग पत्करतो...
         गौरव वाघ - एक शेतकरी 

Monday, November 26, 2018

क्षमता नसलेले लोक गुरू बनलेत:मुरलीधरजी महाराज

क्षमता नसलेले लोक गुरू बनलेत:मुरलीधरजी महाराज


चंद्रपूर/प्रतिनिधी:

जगात क्षमता नसलेले काही लोक गुरू बनून फसवेगिरी करीत आहे, अश्या गुरूपासून महिलांनी सावध राहिले पाहिजे, असे  चिंतन  पूज्य मुरलीधर जी महाराज यांनी व्यक्त केले.
स्थानिक चांदा क्लब ग्राउंड वर श्री राम सेवा समिती तर्फे आयोजित ९  दिवसीय राम कथा महोत्सव च्या तृतिय दिवशी प्रवचन सांगत होते.
कथेच्या प्रारंभी आयोजक रघुनाथ मुंदडा,एकनाथ, उत्तमराव पाटील परिवार च्या हस्ते श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पूजन करण्यात आले .
महाराज पुढें म्हणले की,दवंडी देऊन शिष्य बनवणाऱ्या फसव्या गुरू पासून सावध असले पाहिजे.  विशेषतः महिला वर्ग भावनीक असतो त्यांनी तर गुरु बनवून च नये. या जगात कोणी गुरू आपलं पुण्य कोणत्याही शिष्याला देऊ शकत नाही. आपण आपले पुण्य स्वतः संचित केले पाहिजे. आपल्या कर्मा वर विश्वास ठेवावा, मंत्र देऊन गुरुं नाही बनू शकतो. सत्कर्म करावे. या वेळी किशन लाल चढा, विनोद मणियार, सज्जन कुमार। अग्रवाल, प्रदीप माहेश्वरी, मुन्ना बांगला,  सौ गायत्री सुमेध कोतपल्लीवार, सुधीर बजाज,ऋषिकेश जखोटीया, रामानंद राठीं, राजेश  काकाणी, नवीन अग्रवाल, कमलेश विजयवर्गीय, पवन अग्रवाल सुनील गुप्ताना सन्मानित  करण्यात आले. अशी माहिती सुनील तिवारी यांनी दिली.


  इंदिरा नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या-सुरेश डांगे

इंदिरा नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या-सुरेश डांगे

चिमूर/रोहित रामटेके:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर या लोकवस्ती ला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे , अशी मागणी कस्टकरी जन आंदोलन चे प्रमुख संयोजक सुरेश डांगे यांनी केली आहे, सुरेश डांगे या बाबतीत म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून एकसे पन्नास कुटुंब आपली घरे बांधून राहत आहेत, यात शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक,विधवा महिला ,राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मालकी हक्कांचे पट्टे देण्यात यावे या मागणी करिता निवेदन, धरणें आंदोलन, मोर्चे करण्यात आले , हाती काहीच मिळाले नाही, प्रत्येक निवडणूक काळात राजकीय नेते यांचेकडून खोटे आस्वानाशिवाय काहीच मिळालें नाही, तत्कालीन ग्राम पंचायत व विदमान नगर परिषद भोगवटा कर लावला, या ठिकाणी रस्ता, नाल्या, वौयकीक शौचालय दिले, इंदिरा नगर येथील नागरिकांना महसूल विभागाने अतिक्रमण बाबतीत दंड आकारला, तो दंड जनतेनी जमा करून पावत्या घेतल्या आहेत, चिंमूर पटवारी हलका क्रमांक सहा मधील खसरा नंबर एकसे त्रेचाळीस मध्ये 1.61(चार एकर) मध्ये ही वस्तीत 150 चे वर कुटुंब राहतात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पट्टे देण्यात यावे,अन्यता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा व महात्मा गांधी यांची अहिंसा या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली.
उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू

उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक;एकाचा मृत्यू


उमेश तिवारी/कारंजा (घा):


 नागपूर वरून अमरावतीकडे जात असताना उभ्या  ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. हि घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजत्याच्या दरम्यान कारंजा (घाडगे) वरून ९ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गवर काटोल फाट्याजवळ घडली.  सागर पुरुषोत्तम ढोले वय २९ वर्ष राहणार बोरगाव जिल्हा वर्धा असे या मृत्यू मुखी पडलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.  ट्रेलर क्र. CG.04.HT.9912 रस्त्यावर उभा होता. दुचाकी स्वार सागर पुरुषोत्तम ढोले   दुचाकी क्र. MH.32.AA.0356 नागपूर वरून गावाला जात असतांना ट्रेलरच्या मागे येऊन धडकला.आणि तो खाली पडला.  या नंतर तत्काळ कारंजा येथून रुग्णवाहिका बोलवण्यात आली व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करिता आणले असता रुग्णालयातच सागर ढोले याचा मृत्यू झाला.
अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मनोज चिचघरे/पवनी (भंडारा)

नागभीड कडून दुचाकीने जात असतांना दुचाकीस्वराची उभ्या धान मळणी यंत्राला मागून धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वाराचा गजीच मृत्यू झाला. निलेश भाऊराव तुपटे मु, रानपौना तालुका पवनी जी.भंडारा, असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.पवनी (नागपूर ते नागभिड )रोडवरील भुयार गावाजवळील गजानन मैत्री ढाब्याजवळ हा अपघात घडला, पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत.
राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे

राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):

बेघर, निराश्रीत, भटक्या जमातींच्या मुलांना शिकविण्यासाठीची धडपड करणारे राजकुमार तिरभाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.भारत देश स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर जरी असला तरी देशातील असंख्य समस्या सुटने कठीण आहे यावेळी शासनाची वाट न बघता आपल्याला काही करता येऊ शकते का याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे, असा विचार करणारे राजकुमार तिरभाने यांचा तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी चे अध्यक्ष गजानन ढोबाळे व ग्रामगीताचार्य प्रशांत दादा मानमोडे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात गजानन ढोबाळे यांनी सत्कारमुर्ती तिरभाने सर यांच्याकडून इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे म्हटले. कोणताही मोबदला न घेता समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी आपलं घर, कुटूंब, आणि शाळा सांभाळून कारंजातील बेघर वस्तीत जाऊन मुलांना शिकविण्यासाठी रोजच जातात. ही प्रेरणादायी घटना आहे. यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन नवा मार्ग पत्कारावा असे वाटते.
यावेळी श्री तिरभाने म्हणाले की आता त्या मुलांना पण शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. मुलांना बाराखडी शिकवणे चालू आहे. त्यांना वाटतं की मला माझं नाव लिहीता यावं, घरातल्या सदस्यांची नावे लिहीता यावी अशी जिद्द मनात तयार झाली आहे.
ग्रामगीताचार्य प्रशांतदादा मानमोडे यांनी राष्ट्रसंतांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्व व ग्रामगीता प्रणित शिक्षणप्रणाली याविषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री. सोमकुवर, शिक्षक सोहमनाथ विद्या मंदिर उमरी लाभले होते.त्यांनी सुद्धा गौरवउद्गार केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संगीता शिरखेडकर, मनिषा ढोले, विजय कोडापे व इतर शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल डोंगरे तर आभार कुणाल भक्ते यांनी केले.
धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट

धान उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट

पवनी(भंडारा):
यावर्षी शेतीची बिकट अवस्था झाली असून काही कोरडवाहू असलेल्या शेतकर्‍यांचे एका पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले अनेकांचे धान पानफोल झाल्यामुळे लोंबीत दाना भरला नसल्याने, मरळ झालेल्या धानाचे उत्पादन घटले असून कोरडवाहू शेतकर्‍यांची वाट लागली आहे,मागील दोन -तीन वर्षापासून तालुक्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे, पिकली तर शेती, नाही तर मातीं अशी अवस्था शेती व्यवसायाची आहे, दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे, शिवाय धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कमी भावामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरुन निघत नाही अशी ओरड शेतकर्‍यांची आहे,उत्पादनाचा खर्च वाढत असल्यामुळे तसेच धानावर रोगराई येत असल्यामुळे औषधीचा खर्च अवाढव्य येत आहे, रोवणी पासुन तर मळनी पर्यंत शेतकर्‍यांना शेतमजूराना मजुरी द्यावी लागते, मजुराचे दरही गगनाला भिडले आहे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहे, धानाचे उत्पादनही घटले आहे त्यामुळे भारी वाणाच्या धानाचे दर ३५००रुपये प्रति क्विंटल करण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव तेलमासरे यांनी केली आहे,
पवनी न्यायालयात संविधान दिन साजरा

पवनी न्यायालयात संविधान दिन साजरा

मनोज चिचघरे/पवनी(भंडारा):

भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६९ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.


याच संविधान दिनानिमित्त विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवनी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय यादव यांच्या हस्ते पवनी वकील संघाला अॅड महेंद्र गोस्वामी यांनी भेट दिलेला"भारतीय संविधान" हा ग्रंथ प्रदान करण्यात आला.याप्रसंगी माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी संविधान निर्मिती मध्ये छान.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. 
यावेळी सह न्यायाधीश सपना पाटील, अॅड महेंद्र गोस्वामी, अॅड देशमुख, अॅड भुरे, अॅड सावरकर, अॅड अंबादे, अॅड कावळे, अॅड जिभकाटे, अॅड शेंडे सह कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अॅड मंगेश गजभिये यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. बावने यांनी केले.