সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 03, 2018

जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूर ६२ व्या स्थानी

चंद्रपूर/ललित लांजेवार:
जागतिक आरोग्य संघटने’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे. या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरं ही केवळ भारतात आहे. तर या यादीत चंद्रपूरने हि आपला स्थान प्रदूषणाच्या यादीत पक्के केले असून जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूर ६२ व्या क्रमांकावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जगातील १०८ देशांतील तब्बल ४ हजार लोकवस्तींचा अभ्यास केला. यातून ८५९ शहरांतील प्रदूषणाची पातळी अभ्यासण्यात आली. याच यादीत भारतातील ३२ शहरांवर प्रदूषित असा शिक्का बसला आहे. यानुसार धुलिकणांचे पीएम २.५ व पीएम १० असे वर्गीकरण करण्यात आले. यापैकी पीएम २.५ हे अधिक धोकादायक समजले जाते. मोठे धुलिकण नाक व तोंडाद्वारे फुफ्फुसात जाताना गाळले जातात. मात्र प्रदूषित धुलिकण जेवढे सुक्ष्म तेवढे ते प्रकृतीसाठी घातक ठरतात. पीएम १०च्या यादीतील जागतिक महानगरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. धक्कादायक म्हणजे प्रदूषणाबाबतचे सर्वात धोकादायक शहर म्हणून जगाच्या नकाशावर असलेले बीजिंगची हवाही मुंबईहून बरी असल्याचे ही आकडेवारी सांगते. प्रदूषित महानगरांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले मुंबई जागतिक शहरांच्या यादीत ६३ व्या क्रमांकावर आहे. त्याहून वाईट स्थिती नागपूरची (२४) व चंद्रपूरची (६२) आहे.
जागतिक पातळीवरील तापमानात भारतातील चंद्रपूर हे शहर सर्वोच्च स्थानी पोहोचले आणि पुन्हा एकदा प्रदूषणाच्या जागतिक पातळीवर चंद्रपूरचे स्थान ६२ व्या स्थानी आहे,शहरात २०१६ मध्ये प्रदूषण कमी झाल्यामुळे उद्योगबंदी हटवण्यात आली. पण त्यानंतर वर्षभरातच म्हणजे २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जल आणि जमीनीच्या प्रदूषणात चिंताजनक वाढ झाल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला. यानुसार चंद्रपूरच्या प्रदूषणाचा निर्देशांक ५८.६२ वरून ६२.२ वर पोहोचला होता.हि वाढ प्रदूषित  श्रेणीतून अतिप्रदूषित श्रेणीत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.