সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 27, 2018

नागपुरातील पावसाचा सचिन तेंडुलकरला फटका

नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने शहरात नव्हे तर देशात पहिल्यांदा आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप शनिवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे होणार होता. परंतु, पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोप पुढे ढकलण्यात आले. समारोप स्थगित करण्यात आला नसून कार्यक्रमाची पुढील तारीख काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी उपस्थितांना दिली. 


खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी या उद्देशाने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ६ मे रोजी सिनेअभिनेता अक्षयकुमार व केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. ७ ते २५ मेदरम्यान २० खेळांच्याही स्पर्धा शहरातील विविध भागात रंगल्या. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महापौर नंदा जिचकार आणि अनेक मान्यवर उपस्थित खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोप होणार होता.

सचिन तब्बल ८ वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागपूरात येणार असल्यामउळे त्याला पाहण्यासाठी आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी दुपारी ५ वाजतापासून क्रीडाप्रेमींनी यशवंत स्टेडियम येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. सर्वांना सचिन तेंडुलकरची प्रतिक्षा होती. परंतु सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या रिमझिम पावसाने सात वाजता जोरदार हजेरी लागली. पावसामुळे सचिनच्या विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावरून लँडीगसाठी सिग्नल मिळत नव्हते. विमानतळाच्या अनेक फेऱ्या मारल्यानंतर विमान संभाजीनगरच्या विमानतळाकडे वळवण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.