সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 20, 2018

मनसर येथे टोल हटाओ जन आंदोलन

रामटेक तालुका प्रतिनिधी:
मनसर ओरिएंटल टोल येथे आज टोल हटाओ कृती समिति रामटेक तर्फे एक दिवसीय लाक्षणिक जन आंदोलन पुकारण्यात आले, सदर टोल हा नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र 07 वरील मानेगाव टेक येथील 651/00 कि मी वर स्थानांतरीत करने, तीर्थक्षेत्र रामटेक येथे येणाऱ्या लहान चार चाकी खाजगी वाहनाना टोल मुक्त करने, मनसर येथील उड्डान पुल व जिल्हा परिषद शाळेसमोर अंडर पास त्वरित तयार करने, कान्द्री वस्ती येथील ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा याठिकानी नागरिकांच्या सुविधेकरिता अंडर पास तयार करने, मनसर ते खवासा दरम्यान रहात असलेल्या शिल्लक लोकांना मोबदला देने आदि बाबत हे आंदोलन पुकारण्यात आले होते. यापूर्वी टोल हटाओ कृति समिति च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना दि 24.01.15 च्या मॉयल कार्यक्रमाच्या जाहिर सभेतील मनसर येथील तातपुरता टोल हटविन्याबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण काढून लेखी निवेदन देण्यात आले होते.                                                            ^^^^^^ या आंदोलनात रामटेक चे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजीत सफेलकर, माजी आमदार आशीष जैस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी नगराध्यक्ष गजेंद्र चौकसे, राजेश ठाकरे, महेंद्र भूरे, राजेश जैस्वाल, परमानंद शेंडे, बालचंद बादुले, अनिल कोल्हे, बिकेंद्र महाजन, राजू भोस्कर, संजय झाडे, हेमराज चोखान्द्रे, राजकुमार खोब्रागडे, पराग जोशी, श्याम मोटवानी आदि उपस्थित होते. हे आंदोलन सर्वपक्षीय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते, यावेळी कुठलीही परिस्थिति चिघडु नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता, दंगा नियंत्रण पथक लाठया काठया घेऊन तैनात असल्याने सर्वांच्या मनात भीति निर्माण झाली होती. थोडी परिस्थिति बिगड़त असल्याचे बघून उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी ताबोडतोब निवेदन स्वीकारुन सर्वाना यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.                                      ^^^^^^^ ओरिएंटल चे अधिकारी बर्गी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की उच्च न्यायालय जो निर्णय देण्यात तो आम्हाला मान्य असणार तसेच हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चा विषय असल्याने तेच यावर निर्णय घेणार, मनसर ते खवासा या 37 कि मी चे काम पूर्ण न होताच टोल कसा स्थानांतरीत होणार असे सांगून तीन ते चार महिन्यात उर्वरित उड्डान पुलाचे व चौपदरिकरणाचे काम पूर्ण होणात असल्याचे सांगितले. तसेच आम्ही स्थानिक 3600 ते 4000 च्या जवळपास लहान मोठे वाहन मोफत सोडत असल्याचे सांगून मानेगाव येथे टोल स्थानांतरित होताच टोल शुल्कात सुद्धा वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.                                          ** आंदोलनाच्या सर्वात शेवटी माजी आमदार आशीष जैस्वाल यांनी आंदोलन स्थळी येऊन टोल का स्थानांतरित होऊ शकत नाही यावर मार्गदर्शन करित असताना कुणीही पक्षाचे राजकारण करू नये असे म्हणताच आ रेड्डी यांनी त्यांना उलट उत्तर देताच त्यांच्यात तू तू मै मै सुरु होताच उपस्थित सर्व नागरिकांनी त्याचा विडिओ बनविन्यास सुरुवात करताच परिस्थिति चिघळत असल्याचे बघून चंद्रपाल चौकसे यांनी मध्यस्ति करुण वाद संपुस्टात आणला, मात्र रेड्डी यांनी रामटेक चे खासदार कृपाल तुमाने हे एकाही आंदोलनात सहभागी झाले नाही ते जनतेचे प्रतिनिधि नाही का? त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते यावर आशीष जैस्वाल यांनी गडकरी साहेब व बावनकुले साहेब पण उपस्थित नाही असे प्रत्युत्तर दिले. रेड्डी यांनी आपल्या कडे दिल्ली येथील मीटिंगचे पत्र असून त्यावेळी सुद्धा कृपाल तुमाने उपस्थित नव्हते हे बघा पत्र, पत्र इंग्रजीत असल्याने ते मला वाचता येत नाही हे ऐकताच उपस्थित जनसमुदायात हास्य उमटले व जनु हे आंदोलन नसून हास्य सम्मेलन असल्याची अनुभूति जनतेला काही वेळेकरिता झाली. आजच्या या 10 ते 6 च्या दरम्यान असलेल्या जन आंदोलनात मात्र चार तास टोल मुक्त करन्यात आला होता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.