সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 24, 2018

चंद्रपुरात कॉंग्रेसला दणका;भाजपचे रामदास आंबटकर विजयी

रामदास आंबटकर साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झालेत. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदार संघात भाजपानं बाजी मारली असून भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर विजयी झाले आहेत.
वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी २१ मे रोजी निवडणूक पार पडली होती,या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली.यात भाजपचे रामदास आंबटकर ५५० मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना   ४६२ मतांवर समाधान मानावे लागले. यासोबत अपक्ष उमेदवार जगदीश ठावरी व सौरभ तिमांडे यांना आपले खाते ही खोलता आले नाही हे विशेष...
२१ मे रोजी झालेल्या या निवडणुकीत ९९.७२ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या या मतदानामध्ये १०५९ सदस्यांपैकी १०५६ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता.तर हिंगणघाट,आर्वी, चामोर्शी या मतदार केंद्रावर प्रत्येकी एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. भाजपसाठी जी लढत प्रतीष्ठेची मानली जात होती,यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्री सुधीर मूनगंटीवार आणि हंसराज अहिर तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार खासदारांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली होती,तर मतांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजपच्या एकून ३० नगरसेवकांना महाबळेश्वर येथे सहलीला पाठविण्यात आले होते,या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव नावडकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडून वर्ध्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, गडचिरोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा निवडणूक अधिकारी सिमा अहीरे, चंद्रपूर जिल्हयातील उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, क्रांती डोंबे, महोदव खेडकर, उमेश काळे, रविंद्र राठोड यांच्यासह जिल्हयातील तहसिलदार व अन्य अधिका-यांनी या निवडणुकीचे काम पाहिले. अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे हे देखील या प्रक्रियमध्ये सहभागी झाले होते. विजयी उमेदवाराच्या स्वागतासाठी यावेळी खासदार रामदास तडस, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार समिर कुणावत, आमदार देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजभे, आमदार दादाराव केचे, चंद्रपूरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा व अन्य पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.