चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व स्वताच्या गरजा भागविण्यासाठी चोरी करणाऱ्या एका सोनसाखळी चोरट्यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.विकेश उर्फ विक्की गणवीर वय २३ वर्षे रा. दुर्गापूर असे या अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. ५ मे २०१८ रोजी दुर्गापूर येथील शक्तीनगर परिसरातील वेकोलीच्या मनोरंजन सभागृहात वेकोलिच्या कर्मचार्यांच्या घरचे लग्न होते,ह्या लग्नासाठी फिर्यादी वर्षा रामदास जाधव वय ५३ वर्षे ह्या लग्न लावून आई व शेजारणी सोबत घरी परत येत असतांना रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची चपलाकंठी व ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकून ८० हजार रुपयाचे सोने चालत्या गाडीवरून चोरून नेले,या तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक.१९३/१८ कलम ३९२ भांदवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवारी दुर्गापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि आरोपी विकेश उर्फ विक्की गणवीर हा एका सराफा दुकानात येणार असून तो त्या व्याप्याराला सोने विकणार आहे.हि बाब माहित होताच तपास अधिकारी पीएसआय विवेक देशमुख यांनी आपल्या चमू सोबत सापळा रचला व आरोपी सराफा दुकानात येताच त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.तसेच या चोरीच्या घटनेतील सोने हे त्याने एका फीरोज खान अन्वर खान इंदिरानगर येथील मित्राला अतिशय अल्प किमतीत विकले व त्याने हे सोने मुटूठ फायनान्स कंपनीत स्वताच्या नावे गहान ठेवले. या तपासात पोलिसांनी उर्वरित दागिने जप्त केले यात एकून १ लाख २० हजार किमतीचे दागिने दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आले .या संपूर्ण प्रकारचा तपास पोलीस करत असून यात आणखी काही चोरीचे गुन्हे उघळकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे,सदरची कारवाई पो.नि.यादव,पोउनि विवेक देशमुख,पोहवा सुनील गौरकर,र्राज्निकांत पुठावार,नापोशी जगाजन नगरे,उमेश वाघमारे,पुरुषोत्तम रामटेके,यांच्या मार्फत करण्यात आली.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)

