महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील महावितरणच्या ग्राहकसेवेत लक्षणिय सुधारणा झाल्या आहेत
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांना पदाची सुत्रे स्विकारून 16 मे रोजी एक वर्ष पुर्ण झाला. या वर्षभराच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या आध्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या संकल्पनेवर आधारीत ग्राहकेसेवेचे व्रत स्विकारीत प्रादेशिक कार्यालयाने दमदार कामगिरी करीत अनेक आघाड्यांवर यश संपादीत केले आहे.
प्रादेशिक कार्यलयाच्या पुढाकाराने विदर्भातील अकराही जिह्यात महावितरणने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये दमदार कामगिरि करीत महावितरणचा लौकीक वाढ़विला आहे. परिक्षेत्राची वितरण हानी आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 14.6 टक्के होती ती आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 1.1 टक्क्यांनी कमी होऊन 13.5 टक्के झाली आहे, तर वीजपुरवठ्यात 2.8 टक्क्यांनी वाढ झाली असून कृषी वीज वापरात 1.7 टक्के आणि गैरकृषी वीज वापरात 3.6 टक्यांनी वाढ झाली आहे, सोबतच उच्चदाब वीज विक्रीत 7.3 टक्क्यांनी घसघसीत वाढ झाली आहे. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील वीजबिलापोटी वसुलीची कार्यक्षमता मागिल आर्थिक वर्षाच्या 98.59 टक्क्यांच्या तुलनेत 3.22 टक्क्यांनी वाढून 101.81 टक्के झाली तर सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीजबिल वसुली कार्यक्षमतेतही भरीव वाढ झाली आहे. विदर्भातील सर्व 2481 उच्चदाब ग्राहकांच्या मीटरचे स्वयंचलीत वाचन होत असल्याने मानवी हस्तक्षेप संपुर्णपणे टाळून अचुक बिलांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याशिवाय सर्व 3967 वीजवाहिन्यांवरील मीटरचे वाचन सुरु झाल्याने अचुक ऊर्जा अंकेक्षण शक्य झाले आहे.

प्रादेशिक कार्यालयाच्यांच्या निर्मितीमुळे अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्याने अनेक गोष्टींचा निपटारा स्थानिक पातळिवर होऊ लागल्याने महावितरणच्या दैंनंदिन कामकाजात पारदर्शकता आली आहे. प्रादेशिक कार्यालयाच्या सातत्त्याने होत असलेल्या पाठपुराव्यामुळे क्षेत्रिय कार्यालयात येणा-या ग्राहक तक्रारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फ़े मागिल वर्षात 22 प्रकरणांची नोंद झाली होती तर 2017-18 मध्ये 4 प्रकरणांची नोंद झाली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रभावी मार्गदर्शनात महावितरणचा लौकील उत्तमोत्तम ग्राहकसेवेच्या माध्यमातून अधिकाधिक वाढावा यासाथी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत हे सातत्त्याने प्रयत्नरत असून ग्राहकांनीही त्यांना कुठली अडचण किंवा कुणाबाबत तक्रार असल्यास वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधावा आणि तेथे त्यांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण व्हावे यासाठी प्रादेशिक संचालक कार्यालयाने helpdeskrdnagpur@gmail.com यावर हेल्पडेस्क सुरु केले असून, प्रादेशिक संचालक स्वत: या ईमेलवर येणा-या तक्रारींची योग्य दखल घेणार असून ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास ग्राहकांना जाणीवपुर्वक त्रास देणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे. महावितरण ही सेवा देणारी कंपनी असल्याने प्रत्येक कर्मचा-यानेही आपली ग्राहकसेवेप्रती असलेली भुमिका बजावतांना महावितरणची प्रतिमा कुठेही मलीन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117


Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
