সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 20, 2018

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय तुमराम अविरोध

पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची द्विवार्षिक आमसभा रविवारी २० मे रोजी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडली़ यावेळी पत्रकार संघाची पुढील दोन वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली़ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय तुमराम यांची तर सचिवपदी प्रशांत विघ्नेश्वर यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली़
पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत देवतळे, कोषाध्यक्षपदी जितेंद्र मशारकर, संघटन सचिवपदी साईनाथ सोनटक्के, सहसचिवपदी सुशील नगराळे यांची निवड करण्यात आली़ कार्यकारिणीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे, देवानंद साखरकर, एजाज अली, विनोद बदखल, खुशाल हांडे यांची अविरोध निवड करण्यात आली़ सभेच्या सुरुवातील शोकप्रस्ताव ठेवण्यात आला़ यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला़ यावेळी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा घटनांचा निषेध करून चर्चा करण्यात आली़ यानंतर सरचिटणीस प्रशांत विघ्नेश्वर यांनी अहवाल वाचन केले़ तर कोषाध्यक्ष मजहर अली यांनी जमाखर्च व हिशेब तपासणीचा अहवाल मांडला़ मावळते अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी मनोगत व्यक्त कले़ यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली़ पीठासीन अधिकारी म्हणून सुनील देशपांडे तर साहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मोहन रायपुरे यांनी भूमिका पार पाडली़ यावेळी मावळते अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी संजय तुमराम यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करीत पदभार सोपविला़

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.