সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 10, 2018

दक्षिण-पश्चिम नागपुरातील वीज पुरवठा शुक्रवारी ३ तास असणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणला करावयाच्या अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची आणि महामेट्रोच्या कामांमुळे शुक्रवार दि. 11 मे 2018 रोजी कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या रामदासपेठ, छत्रपतीनगर, कॉग्रेसनगर, सोमलवाडा, रामनगर आणि त्यासभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा एक ते तीन तासापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी 7 ते 10 यावेळेत पंचदीप नगर, डॉक्टर कॉलनी, छत्रपतीनगरचा काही भाग, तर सकाळी 8 ते 11 या वेळेत रामदासपेठ, कॅनाल रोड, गंगा हॉस्पिटल, शक्ती ऑफसेट, श्याम पॅलेस, मेडीकल कॉलनी, प्रियंका अपार्टमेंट, हम्पीयार्ड रोडचा भाग, अजनी रेल्वे स्टेशन, हॉटेल ग्रीन सिटी, शिवाजी सायन्स कॉलेज, हयात एन्क्लेव्ह, ऑल इंडिया रिपोर्टर, कॉंग्रेस नगर, निलगंगा अपार्टमेंट. छोटी धंतोली, एकात्मता नगर पूजा लेआऊट, दादाजीनगर, पक्कीड्डे लेआउट, ऑर्बिट एम्पायर, राधेश्यामनगर, रामनगर,राममंदीर, कर्नाटक मंदिर या भागात याशिवाय सकाळी 9 ते 10 या वेळेत मॉरीस कॉलेज रोड, मेहदीडिया चौक या भागात तर सकाळी 9 ते 11 या वेळेत सोमालवाडा, राजीवनगर, सावित्रीविहार, सोमालवाडा वस्ती, हॉटेल प्राइड, एअरपोर्ट सेंटर पॉईंट, मुळिक कॉम्प्लेक्स, उदयन, विदर्भ प्रिमियम कॉलनीचा भाग तेलंगखेडी, मारारटोली, रामनगरचा आणि अमरावती रोडचा काही भाग या परिसरातील वीजपुरवठा खंडित राहील.
वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
   --------------------------------------------------------------------------------------  
--------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.