आजवर आपण लग्न मंडप, बस, रेल्वे, विमान, जहाज, पाण्याच्या खाली, पॅराग्लायडिंग, पॅराशूटच्या मदतीने आकाशात आणि समुद्राच्या अगदी मध्ये आलिशान क्रुझवर थाटामाटात लग्न केल्याचे बघितले आणि ऐकलेही आहे, परंतु चंद्रपूर जिल्हय़ात चक्क एका रुग्णवाहिकेत विवाह सोहळा पार पडला. आजारी असलेल्या वधूने ऑक्सिजन मास्क लावून नवऱ्या मुलाला वरमाला घातली. गोंडपिंपरी तालुक्यातील चिंतलधाबा येथे हा हृदयस्पर्शी विवाह समारंभ ९ मे रोजी पार पडला.
लग्नघटीका जवळ आली असताना अचानक वधूची प्रकूर्ती बिघडल्यावरही मंडपात रुग्णवाहिका आणून लग्न लावण्यात आल्याची घटना बुधवारी चंद्रपूर येथे झाली. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर येथील आत्राम-सोयाम कुटुंबीयांनी आदर्श घालून दिला.लग्न आटोपताच वधूला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील वढोली येथील गणेश आत्राम याचे लग्न बुधवारी पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील वैशाली सोयाम हिच्याशी निश्चित झाले होते. लग्नासाठीची सर्व तयारी पूर्ण होऊन लग्नाची वेळ जवळ आली. मात्र, लग्नाच्या दोन दिवसांपूर्वीच वैशालीची प्रकूर्ती अचानक बिघडली आणि तिला चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करावे लागले. दोन दिवसांत प्रकूर्ती सुधारेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, वधुच्या प्रकूर्तीत सुधारणा झाली नाही. दुसरीकडे दोन्ही परिवारांत लगीनघाई सुरू होती. विवाहाचा दिवस उजाडला आणि वढोली येथील वरात वधूच्या मंडपात येऊन धडकली. वऱ्हाडीही दाखल झाले. मात्र, वधू रुग्णालयात असल्याने शेवटी दोन्ही कुटुंबांनी तोडगा काढत मुलीला रुग्णवाहिकेतून लग्नमंडपी आणण्याचे ठरले. त्यासाठी डॉक्टरांची मंजुरीही घेण्यात आली. दोन तासांत सलाइन लावलेल्या स्थितीत मंडपात वधू हजर झाली. तिथेच तिला सजवून मंगलाष्टके सुरू झाली. 'शुभमंगल सावधान' म्हणत वऱ्हाड्यांनी अक्षतांचा वर्षाव केला आणि नवदाम्पत्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
रुग्णवाहिकेत लागलेले हे लग्न आता सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. या लग्नाने एक आदर्श ठेवल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे. दरम्यान, वधूची पकूर्ती अजूनही सुधारली नसल्याने लग्नसंस्कार पूर्ण होताच तिला पुन्हा त्याच रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)