गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष कामगिरी बजावल्याबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदके जाहीर झाली आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, डॉ. राजू भुजबळ, अशोक नखाते तर नाशिक ग्रामीणचे निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिऱ्हे, मालेगाव शहरचे उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांना ती देण्यात येणार आहेत.
नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरीबद्दल शासनाच्या गृहविभागातर्फे सदरचे पदक जाहीर करण्यात येतात. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा परिसर राज्यातील नक्षलीग्रस्त आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांना या परिसरात सेवा बजाविण्यासाठी ही पदके जाहीर केली जातात.
शासनाने पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी आंतरिक सुरक्षा सेवा पदक 22 जणांना जाहीर केले आहे. यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक ग्रामीणचे 2 उपविभागीय पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र अकादमीतील एका पोलीस उपअधिक्षकांचा समावेश आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, डॉ. राजू भुजबळ आणि अशोक नखाते यांचा समावेश आहे. डॉ. राजू भुजबळ आणि अशोक नखाते यांना यापूर्वी नक्षलग्रस्त भागातील कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
तसेच, नाशिक ग्रामीणचे निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिऱ्हे, मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने आणि नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये कार्यरत पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांना "आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर झाले आहे.

-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)

