সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 27, 2018

'मन की बात'मधून चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे कौतुक

चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. तर चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आज प्रसारीत होत असलेला 'मन की बात' कार्यक्रमाचा ४४ वा भाग होता.


चंद्रपूर - मिशन धाडसी या कार्यक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासी आश्रमशाळांमधील, ५ गिर्यारोहकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, "मला अभिमान आहे ह्या आदिवासी मुलांचा".  एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्यांचंही प्रचंड कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून लोक एव्हरेस्ट शिखर चढत आहेत. यशस्वीरित्या एव्हरेस्ट चढण्याची मोहीम फत्ते करणाऱ्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व साहसी वीरांचे, विशेषतः मुलींचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. 

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथील आदिवासी आश्रमशाळेचे १० विद्यार्थी महिनाभरापूर्वीपासून माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. यातील पाच विद्यार्थ्यांनी हे शिखर गाठले. यामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मडावी, विकास सोयाम, परमेश आले व मनिषा धुर्वे आणि शासकीय आश्रमशाळा जिवती येथील कवीदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी हे शिखर गाठले. या धाडसी मुलांची पंतप्रधान मोदींनी मन की बात या कार्यक्रमात दखल घेतल्यामुळे समस्त जिल्ह्याची मान उंचावली आहे.

I laud 5 tribal students from Chandrapur, Maharashtra, Ajeet and Deeya Bajaj, Sangeeta Bahl and a BSF contingent for scaling the Mount Everest. The BSF contingent also brought back dirt that had accumulated in the mountains: PM Narendra Modi  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.