সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 18, 2018

रिमझिम पाऊस : गारवा वाढल्याने ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

भुयार : गावामध्ये शेकोट्या पेटविल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते, 
मनोज चिचघरे/ भंडारा पवनी, प्रतिनिधी 
ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वार्‍यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे,
शनिवारपासुन जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले , रविवारी पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरीला सुरुवात झाली, सोमवारी रात्री पासून रिमझिम पाऊस पूणा बरसत होता, त्यातच बोचरा वारा वाहत होता, तापमान कमालीचे खाली घसल्याने प्रचंड थंडी निर्माण झाली होती, घराबाहेर निघणार प्रत्येक जण उबदार कपडे घालूनचं बाहेर पडत होता. शहरातील विविध भागात भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे दृष्य होते, ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या होत्या, या अकाली पावसाचा फटका सर्वानाच बसला आहे, थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना होत असून सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे,
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पाऊस बरसला, या पावसाने भाजीपाला आणि रबी पिकांंचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे, रबी पिके पिवळे पडू लागली आहेत, पवनी पालांदूर परिसरात रबीतील उळीद, मूग, लाखोरी, आधी पिकांना या अवकाळी पावसाचा लाभ होणार असला तरी बागायतदार शेतकर्‍यांची मात्र डोकेदुखी ठरत आहे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाने विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली, मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे,

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.