हैदराबाद:(काव्यशिल्प ऑनलाईन):
रेल्वेगाड्यांमधील अन्नपदार्थांच्या दर्जावरून अनेक तक्रारी येत असताना,एका विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचं पाणी मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं संबंधित चहाविक्रेत्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्थानकात हैदराबाद-चारमीनार एक्स्प्रेसमध्ये हा किळसवाणा प्रकार घडल्याचे रेल्वेनं सांगितलं. विक्रेत्यानं चहा-कॉफीच्या कॅनमध्ये एक्स्प्रेसमधील टॉयलेटचा पाणी मिसळलं होतं. पाणी मिसळल्यानंतर विक्रेता चहा-कॉफीच्या कॅनसह टॉयलेटमधून बाहेर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी दोषी चहाविक्रेत्याला रेल्वेनं एक लाख रुपयांचा दंड केला आहे.