সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 30, 2015

पदे सरळसेवेने भरणार

जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंताची 1400 पेक्षा अधिक पदे सरळसेवेने भरणार

जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता पदावरून उपअभियंता/उपविभागीय अधिकारी या पदावर 473 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. सदर पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबविणेबाबत फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू करण्यात आली व त्याप्रमाणे चार महिन्यांच्या कालावधीत 473 पदे पदोन्नतीने भरण्यात आली. एवढ्या अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीने उपअभियंताची पदे भरण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच झाल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले. या पदांमध्ये विदर्भातील 130 पदे मराठवाड्यातील 93 पदे समाविष्ट आहेत. यामुळे विविध विभागांतर्गत प्रलंबित प्रकल्‍पांना गती देणे सुकर होणार आहे. तसेच शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदावरील मोठ्या प्रमाणात बऱ्याच कालावधीपासून रिक्त असलेल्या जागा देखील तातडीने भरण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांनी निर्देश दिले असून सुमारे 1400 पेक्षा अधिक पदे सरळसेवेने भरण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रलंबित 32 प्रकल्पांना शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान

दरम्यान बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध 32 प्रकल्पांना शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकल्प मार्गस्थ होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी महाकाय पुनर्भरण योजनेचा समावेश असून विदर्भातील एकूण 12 व मराठवाड्यातील एकूण 7 प्रकल्पांचा समावेश आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.