चंद्रपूर- भाजपने वेगळा विदर्भ करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याने त्याचा निषेध करताना विदर्भवाद्यांनी चंद्रपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने चंद्रपुरातील जटपुरा चौकात पुतळे जाळुन निषेध व्यक्त केला. विदर्भवाद्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करत अनेक ठिकाणी वेगळ्या विदर्भाचे झेंडे फडकविले. विदर्भ कनेक्ट या संघटनेने आज भव्य कार्यक्रम घेवुन वेगळ्या विदर्भ राज्याचे ध्वजारोहण केले. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ घेवुन महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला.आणि यापुढे विदर्भवाद्यांनी हा लढा अधिक तीव्र व युवकाभिमुख करण्याचा संकल्प करण्यात आला.