সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 09, 2015

इंटकच्या पदाधिकाऱ्याची हत्या- दोघांना अटक

पाटणसावंगी - इंटक व कॉंग्रेसचे पदाधिकारी चिरकूट मौजे (वय 55) यांची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाटणसावंगी येथील राजहंस लॉनसमोर घडली. हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. फिरोज ताज मोहम्मद शेख (वय 46), दिलीप रतनलाल मदने (वय 42) अशी आरोपींची नावे आहे. शॉपिंग काम्प्लेक्‍समधील दुकान गाळ्याच्या खरेदी-विक्रीच्या मागणीवरून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कोलमाइन्स सोसायटी वर्कर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव असलेले चिरकूट मौजे हे मानकापूर येथील रहिवासी आहेत. मौजे यांच्या मालकीचे राजहंस लॉन पाटणसावंगी येथे आहे. तिथे नेहमी सायंकाळी ते येत असत. शुक्रवारी सायंकाळी ते गोदामाचे सुरू असलेले बांधकाम बघण्यासाठी आले. पाटणसावंगी बसस्थानकाशेजारी असलेल्या सत्यम बिअरबारजवळ ते उभे असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. चाकूने सपासप वार केले. त्यानंतर सायंकाळच्या अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी सावनेरच्या दिशेने पळ काढला. राजहंस लॉनमधील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मौजे यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर वर्दळीचा आहे. याप्रकरणी पाटणसावंगी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. उपविभागीय अधिकारी मोरेश्‍वर मेश्राम यांच्या नेतृत्वात ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी तपास सुरू केला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.