সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 15, 2015

सोमनाथच्या श्रमविद्यापिठात तरुणाई गिरविणार श्रमाचे धडे

सचिन वाकडे 
मूल- श्रमर्षी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ प्रकल्प ( ता. मूल जि. चंद्रपूर ) येथे शुक्रवार दिनांक 15 मे पासून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली असून श्रमसंस्कार छावणीचे हे सलग 48 वे वर्ष आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि  ईतर राज्यातून सहाशेच्यावर युवक युवती शिबिर स्थळी पोहचले आहेत.
महारोगी सेवा समितीच्या वतीने स्थापन झालेल्या आनंदवन मधील कृष्ठरुग्णांनी बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सोमनाथ प्रकल्प उभा केला आहे. 1967 साली देशभरातील युवकांना एकत्रित करुन याच प्रकल्पात श्रमसंस्कार छावणी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या श्रमसंस्कार छावणीत सहभागी होण्यासाठी युवक युवती वर्षभर मे महिण्याची वाट पाहतातदरवर्षी दि. 15 मे ते 22 मे दरम्यान हे शिबिर पार पडते. चंद्रपूर सारख्या हाॅट जिल्हयात मे महिण्याच्या रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता युवा पिढीचे शेकडो हात सोमनाथच्या भूमीत जलसंधारण, मृदसंधारण, शेतीची कामे यासाठी सरसावतात. यासोबतच विधायक कार्याच्या चळवळीतील जेष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनात स्वताचे व्यक्तीमत्व घडवितातबाबा आमटेंच्या पश्चात महारोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांच्या  मार्गदर्शनात श्रमसंस्कार छावणीतून युवा पिढीला देश आणि विधायक कार्यात सामावून घेतले जाते.


तरुण्ईचा प्रतिसाद:- यंदा पहिल्यांदाच सोमनाथ श्रमसंस्कार छावणीसाठी आॅनलाईन नांेदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून  दि 25 एप्रिल रोजी नोंदणी बंद करण्यात आली. तोपर्यंत 650 जणांनी नोंदणी केली होती. िाबिराच्या एक दिवस अगोदर पर्यंत राज्यातील कानाकोपÚयातून शिबिरात सहभागी होण्यासाठी आयोजकांना शेकडो काॅल्स आणि मेल्स येत होते. मात्र शिबिराथ्र्यांची गैरसोय होवू नये म्हणून नाईलाजास्तव प्रवेश बंद करण्यात आले. शिबिरासाठी सहा वर्षाच्या बालकांपासून तर 75 वर्षाच्या आजी आजोबा सुध्दा सहभागी झालेले आहेत. अर्थातच त्यामध्ये 15 ते 35 वर्षाच्या तरुण तरुणींच्या सहभाग सर्वाधिक आहे. िाबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शक डाॅ. विकास आमटे, संयोजक कौस्तुभ आमटे, डाॅ. शितल आमटे हे पूर्णवेळ शिबिरस्थळी आहेत.अशी माहिती शिबिरप्रमुख रविंद्र नलगिंटवार यांनी सदर प्रतिनिधीला दिली. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.