সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 08, 2015

हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी

हाजीची हजेरी अन पोलिसांची उचलबांगडी
घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेनंतर पोलिसांची उचलबांगडी झाल्याने आजवरच्या चोर - पोलिस खेळातील तथ्य समोर येवू लागले आहे. मात्र या अटकेनंतर पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा चेहरा मात्र समोर आला आहे. अटकेनंतर आपल्या यंत्रणेतील काही पोलीस अधिकारी आणि शिपायांबद्दलचा खळबळजनक खुलासा पोलीस अधिक्षकांच्या हाती लागला आहे.

हाजी तीन गुन्ह्यांमध्ये फरार होता. घुग्घुसमध्ये सैयद इस्त्राईलच्या वाहनावर ३ मे २०१४ मध्ये त्याने गोळीबार केला होता. त्यानंतर अक्षय येरूळकर याचे अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. या सोबतच खंडणीचेही गुन्हे त्याच्यावर आहेत.

कोळसा तस्करीच्या याच शीतयुध्दाची परिणती गॅंगवॉरमध्ये झाली होती. शेख हाजी सरवर याने राष्ट्रवादीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तिरुपती पॉल यांची भरदिवसा मुख्य रस्त्यावर तलवारीने हत्या केली. याचे पडसाद कोळसा तस्करीच्या व्यवसायावर पडले.

घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर मुखत्यार अहमद याचा सोमवार (८ डिसेंबर)ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पोहचताच ५० ते ६० युवकांनी व्यापाºयांना धमकावून बळजबरीने घुग्घूस बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घुग्घूस येथील कोळसा व्यापारी टुल्लू उर्फ शागीर अहमद मुखत्यार याच्यावर नागपूर येथे गोळीबार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. ही वार्ता घुग्घूस येथे पसरताच ५० ते ६० युवक दुचाकीने बाजार परिसरात पोहचले व त्यांनी व्यापाºयांना धमकावून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणाव शांत झाला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. टुल्लू मुखत्यार याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, धमकाविणे, खंडणी वसूल करणे असे १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल होते. त्याला तडीपारही करण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वी घुग्घूस सोडून नागपूरला वास्तव्यास गेला होता. तिथे त्याच्याच वाहनामध्ये बसलेल्या युवकाने त्याच्यावर गोळी झाडली. कुख्यात गुंड हाजी शेख सरवर याच्यासोबत टुल्लूने घुग्घूस येथे कोळशाचा व्यापार सुरू केला होता. शेख सरवरशी खटकल्यामुळे त्याने स्वत:च हा व्यवसाय सुरू केला व नागपूर येथे राहायला गेला होता. 

विविध गुन्ह्यांचे आरोप शिरावर घेऊन पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात हाजी सरवर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजीव जैन यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी या मोहिमेत कुणालाही सहभागी न करता केवळ स्थानिक गुन्हे शाखेवर ही कामगिरी सोपविली. या शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांच्यासह निवडक शिपायांना घेऊन सापळा रचला. हाजीला नकोडा परिसरातून अलगदपणे पकडण्यात यश आले. अटकेनंतर त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर करण्यात आले. त्याच्याकडून घेतलेल्या कबुलीजबाबात मात्र खबळजनक माहिती पुढे आली. आपल्या विरूद्ध सुरू असलेल्या पोलिसाच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपणास काही पोलीसच पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने अधीक्षकांसमक्ष केला. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मध्यंतरी नकोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. मात्र पोलीस खात्यातीलच काही मुखबीरांनी त्याला माहिती दिली. त्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हाजीच्या अटकेनंतर त्याने स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांपुढे दिलेल्या बयाणातून हे सत्य उजेडात आले. त्याची दखल घेत त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचार्‍यांची तातडीने उचलबांगडी केली.
चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर परिसरातही गुन्हेगारीचे साम्राज्य उभे करणारा हाजी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुन्हेगारी विश्‍वात अत्यंत सराईत म्हणून ओळख असलेल्या हाजीला परजिल्ह्यातील अन्य गुंडांच्या टोळ्यांशी वैर होते. घुग्घूस परिसरात कोळशाच्या तस्करीत त्याने चांगलाच जम बसविला होता. या व्यावसायिक स्पर्धेतून त्याचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी नेहमीच वाद होत असत. यादरम्यान, हाजीचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसही हाजीच्या मागावर होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि गुंडाच्या अन्य टोळ्यांकडून त्याला भीती होती.

भाडय़ाचे गुंड पोसून कोळसा तस्करीचा हा व्यापार सुरू झाला. त्याला पोलीस दलाची मदतही मिळाली. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोळसा खाणींचा परिसर तस्करी आणि गुंडांच्या दहशतीने काळवंडला आहे. त्याला स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांचीही साथ मिळाली. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.