वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्तीसाठी जिल्हयातील महीलांनी अथक लढा उभारलेला होता. या लढयानंतर नुकतेच महाराष्ट शासनाने दारूबंदी जाहीर करून अमलबजावणी सुरू केलेली आहे. दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करून अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात माराईपाटन ते महाकाली अशी दारूमुक्ती निर्धार यात्रा काढण्यात आली होती या यात्रेचे समारोप व दारूबंदीचे वचनपुर्ती करणारे जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार कार्यक्रम महाकाली मंदीराचे पटांगणात करण्यात आला.
डाॅ. राणी बंग यांचे हस्ते जिल्हयाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी यात्रेदरम्यान शासनाने दारूबंदी केल्याबदल आभाराचे निवेदन मुनगंटीवार यांना भेट देण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती मुनगंटीवार म्हणाले की,‘दारूबंदीची लढाई पुर्ण झालेली असुन व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. दारूबंदीने 300 कोटीचे रूपयाचे नुकसान झाले मात्र 2500 कोटी रूपये कुटुंब चालविण्याकरीता आई-बहीणींकडे जात आहेत. दारूबंदीने कायदे कडक करणार असुन जिल्हयात दारूविके्रत्यांवर तडीपाराची कारवाई केले जाईल, व न्यायव्यवस्थेवर विश्वास असुन लोकमताचा आदर नक्कीच होईल’ अशी आशा व्यक्त केली. कंेद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी दारूबंदी झाल्याने जिल्हयाचे महीलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हयातही पारोमितासारखे नेतृत्व उभे होत आहे. यासाठी नेहमी आमचे सहकार्य राहील असे बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. राणी बंग यांनी ‘ चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदीचा फायदा गडचिरोली जिल्हयातही होत आहे. दारू दुकानातील कामगारांचे शोषण दारू दुकानदारानीच केले असल्याचे मत व्यक्त करून सर्व व्यसनापासुन दुर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात अॅड. वामनराव चटप, प्रकाश वाघ, प्रा. जयश्री कापसे, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, राजेश्वर सहारे, आबीद अली, बंडोपंत बोडेकर, प्रमोद कडु, आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सिध्दावार यांनी केले तर आभार अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन विजय कोरेवार यांनी केले.