- जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर
चंद्रपूर : जलयुक्त शिवार अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 218 गावातील प्रस्तावित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, रोह्योचे उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये यंत्रणे मार्फत करण्यात आलेल्या कामाचे नियोजन, त्यावर लागणारी रक्कम व उपलब्ध निधी, जलयुक्त शिवाराच्या गावात लोकसहभागातून गाळ काढण्याची किती कामे झाली, इतर यंत्रणेकडून किती कामे झाली, जिल्हा नियोजनातून जलयुक्त शिवारासाठी द्यावयाच्या रक्कमेचे नियोजन, सीएसआर फंडातून करण्यात आलेल्या कामाची गाव निहाय माहिती, सिमनिक डाटा एन्ट्री व छायाचित्र अपलोड आदींबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या 218 गावात किमान एकतरी काम सुरू झाले पाहिजे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी संबंधितांना दिल्या.