সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 09, 2015

चंद्रपुरात आढळली दुर्मिळ कोलेगल जातीची पाल

चंद्रपूर:- चंद्रपूर पासून नजीकच असलेल्या पठाणपुरा भागातून वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांनी दुर्मिळ कोलेगल जातीची पाल मिळाल्याची नोंद केली.त्याच्या कार्यामुळे सरपटनारे प्राण्यान मध्ये आणखी एका पालीची नोंद झाली,मागील ७ वर्षापासून सरपटनाऱ्या प्राण्याचे अध्ययन सुरु असून त्यांच्या प्रयत्नांना ह्या कार्यामुळे यश मिळाल आहे. 
चंद्रपूर शहर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असून,सोबतच उन्ह्याळ्यातील गर्मिसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच निरनिराळे शोध वन्यप्राण्यावर सुरु असतात,तसाच एक शोध येथील वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांनी लावलेला आहे.चंद्रपूर सभोवतालचा परिसर हा जैव विविधतेने नटलेला असून,तेथे अनेक दुर्मिळ जातीचे पशु ,पक्षी, झाडे, कीटक व सरपटनाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे.मात्र मनुष्य सिमेंटच्या जंगलात आपले जीवन व्यतीत करण्यात मग्न असल्याने अश्या दुर्मिळ प्राण्यांकडे सहसा लक्ष जात नाही अश्या दुर्मिळ प्राण्यांच्या अभ्यासाठी येथील वन्यजीव अभ्यासकांनी त्याच्या शोधाचा निश्याचाय केला व कित्येक वर्षापासून चालत असलेल्या या अभ्यासावर आता खर्या अर्थाने त्यांनी शिक्का मोर्तब केलेला आहे.
ह्या पालीच्या संदर्भात अभ्यासक माहिती देत असे म्हणाले कि,हि पाल कोलेगल जातीची असून त्याचे इंग्रजी नाव forest spotted gecko किवा collegal gecko आहे व त्याचे शास्त्रींय नाव Geckoella Collegalensis आहे.ह्या पालीचा शोध 1870 मध्ये boulenger ह्या वैज्ञानिकाने BR hill कर्नाटकातून लावला.हि पाल केरळ,तामिळनाडू,महाराष्ट्र,गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये मिळाल्याच्या नोंदी आहे.चंद्रपुरातून हि पाल या आधी एका शोध निबंधात २०१० मध्ये प्रसिद्ध करण्यात आली,मात्र त्यानंतर हि पाल कधीच मिळाल्याची नोंद नाही.सदर पाल फार देखणी असून मुख्यत जंगलाच्या भागात तिचे वास्तव्य असते,मात्र हि पाल जंगलाच्या व्यतिरिक्त खडकाळ,माळरान,रान,शेतात सुद्धा मिळते,हि पाल पालापाचोळा,मोठे दगड व जमिनीच्या भेगा यात राहणे पसंद करते,हि पाल मुख्यत काक्रोज,नाकतोडे, रातकिडे,कातरणी व असे अनेक किड्यांना भक्ष्य बनवते.
या अभ्यासात अभ्यासकांना सभोवतालच्या नागरिकांचे मार्गदर्शन मिळाले,सोबतच प्रत्यक्ष व अ प्रत्यक्षरित्या मदत केली,तसेच त्यांना या कार्यात सचिन वझलवार,किरण बावस्कर,वनदीप रोडे,प्रमोद दुबे,प्रशांत खोबरगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.