नागपूर : भाग्यलक्ष्मी पंâड योजनेअंतर्गत बंटी बबलीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून ४ लाख ५४ हजार २०० रुपयाचा अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण कोतवाली हद्दीत नुकतेच समोर आले आहे. हे फसवणूकीचे प्रकरण नोव्हेंबर २०१३ ते २०१४ दरम्यानचे आहे.
नरेंद्र तुळशीराम तिवारी (४९), पद्ममा नरेंद्र तिवारी (४०) दोन्ही रा. चिटणीसपुरा पोलिस चौकीजवळ अशी आरोपी बंटी बबलीची नावे आहेत. जया अनंतराव कोठे (३१) रा. शिवाजीनगर, दुर्गा मेडिकल मार्ग व नातेवाईक, शेजारी अशी इतर फिर्यादींची नावे आहेत. आरोपींनी नातेवाई, शेजारी व परिचीत व्यक्तींना विश्वासात घेऊन भाग्यलक्ष्मी पंâड योजनना सुरु करुन दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखविले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र मुदतीअंती व्याजासह पैसे परत केले नाही. उलट टाळाटाळ केल्याने गुंतवणूकदारांनी त्याचे घर गाठले असता बंटी बबली तिवारी दाम्पत्य घर विकुन पसार झाल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वांना धक्काच बसला. अखेर गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी बंटी बबलीविरुद्ध गुन्हा दाखल केला.