সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 19, 2015

“सायकल चालवा - प्रदूषण हटवा”

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्या सायकल रली
  • चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा उपक्रम
प्रदूषणाच्या बाबतीत देशात अग्रक्रमावर असलेल्या चंद्रपूर शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे आणखी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे चंद्रपूर करांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्धेशाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्य चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे सायकल रालीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात विविध संघटना या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
५ जून रोजी स्थानिक गांधी चौकातून सकाळी ८ वा. सायकल रालीची सुरुवात होणार आहे. हि राली प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकाला वळसा घालून पुन्हा गांधी चौकात जाणार असून प्रत्येकांनी किमान आठवड्यातून एक दिवस सायकल चालवावी, असा संदेश देणार आहे. या रालीचा समारोप गांधी चौकात होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर करांना सायकल चालविण्याचा संदेश देत रविवार सायकल वार राबविण्याचे आवाहन केले जाणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे डॉ. गोपाल मुन्धडा, विजय चंदावर, जुगलकिशोर सोमाणी, दत्तप्रसन्न महादानी, डॉ. सपान दास, सुधाकर कवाडे, adv. मलक शाकीर, सुहास अलमस्त, सुबोध कासुलकर, साजिद कुरेशी, भाविक येरगुडे, गिरीश नंदुरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.