चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसोबत मराठवाड्यातील भाविक मोठय़ा संख्येने येतात. त्यांच्या सुविधांसाठी प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे हजारो भाविक चंद्रपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे.
देवी महाकालीच्या यात्रेला ५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. जवळपास महिनाभर चालणार्या यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक हजेरी लावतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. भाविक प्रवासी वाहनांसह माल वाहतूक करणार्या वाहनातूनही येतात. आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी वाहनातून बसून येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात. यात्रा सुरक्षित पार पडावी, यासाठी अधिकृत प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, आंधप्रदेशातील भाविकही हजेरी लावतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.