সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 23, 2014

सहा जणांवर निलंबन; नेतृत्वाचे काय ?


चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल चंद्रपूरमधील पदाधिकाऱ्यांना फक्त निलंबित केले आहे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चाकरून ​निलंबित केलेल्यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्याचा निर्णय येत्या गुरुवारी राज्यातील मतदान आटोपल्यानंतर घेण्यात येणार आहे. मात्र हि पक्ष विरोधी कृत्य करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे उमेदवारी मिळालेले पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या विरोधात माजी खासदार नरेश पुगलिया गट सक्रिय झाला होता. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आशीर्वादाने 'आप'चे कार्यालय सुरू झाले. निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना देवतळे यांना स्वपक्षीयांच्या विरोधाला सामोरे जाण्याची वेळ आली. हा विरोध थोपवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडे तक्रार केल्यानंतर १० एप्रिलला मतदानादरम्यान शहर अध्यक्ष गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर यांच्यासह ८ जणांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसने पुगलिया गटाला हा जबर धक्का दिला आहे.
ही कारवाई करताना काँग्रेसने अतिशय गुप्तता बाळगली. आता ही कारवाई उघड होताच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती अध्यक्ष रामू तिवारी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, उषा धांडे, बल्लारपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष रजनी मूलचंदानी, बल्लारपूर तालुका अध्यक्ष घनश्याम मूलचंदानी या सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी जारी केले.
नरेश पुगलिया व त्यांचे पुत्र राहुल यांना दोन वेळा अपयश पदरी पडले. असे असतानाही देवतळे यांच्याविरुद्धचे वैर चव्हाट्यावर आले. सहा महिन्यांपूर्वी प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच त्यांच्या समर्थकांनी थेट माणिकराव ठाकरे यांच्यावर आरोप लावले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात देवतळे यांच्या निष्क्रियता मांडण्यात आली. यानंतरही पुगलिया यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचा तीव्र विरोध होता.
चंद्रपुरातील काँग्रेस शहर अध्यक्ष आणि महापौरांसह अन्य आठ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना नरेश पुगलिया यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.